नागपुरात चिमुकलीसोबत अश्लील चाळे करून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 20:13 IST2018-09-29T20:12:08+5:302018-09-29T20:13:54+5:30
तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत एका आरोपीने अश्लील चाळे केल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे नोंदवली. त्यावरून कळमना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नागपुरात चिमुकलीसोबत अश्लील चाळे करून विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत एका आरोपीने अश्लील चाळे केल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे नोंदवली. त्यावरून कळमना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आकाश अरुण माचुरकर (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. तो कळमन्यातील कामनानगरात राहतो.
पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीसोबत आरोपी माचुरकरने गुरुवारी सकाळी ८.१५ ते दुपारी १ या वेळेत अश्लील चाळे करून तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बघितल्यानंतर मुलीच्या पालकांनी त्याला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तो मुजोरी करीत असल्याचे पाहून मुलीच्या पालकांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्कार, विनयभंग तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, या संबंधाने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.