शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लहानग्या बहिणींसह चौघींचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 20:42 IST

अल्पवयीन बहिणींसह चार विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना सोमवारी नागपूर शहरातील विविध भागात घडली.

ठळक मुद्देसोनेगाव, एमआयडीसी आणि इमामवाड्यात गुन्हा : एकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन बहिणींसह चार विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना सोमवारी शहरातील विविध भागात घडली. या प्रकरणी सोनेगाव, एमआयडीसी आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनेगावमधील मिहान परिसरात ४ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणी रात्री १० च्या सुमारास घराजवळ सायकल चालवित होत्या. तेथे आलेल्या सतीश रहांगडाले (वय ३०) याने या बालिकांसोबत लज्जास्पद वर्तन केले. बालिकांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपी पळाला. बालिकांनी आपल्या पालकांना ही माहिती दिली. त्यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपी सतीशला अटक केली.दुसरी घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसीत घडली. एमआयडीसीतील २४ वर्षीय तरुणीसोबत आरोपी समीर मेंढे (वय ३१, रा. धम्म किर्तीनगर) याची फेसबुकवरून फ्रेण्डशिप झाली होती. त्याच्याशी संपर्क वाढल्यानंतर तो वाममार्गाला असल्याचे तिला कळले. त्यामुळे तिने त्याला टाळणे सुरू केले. त्यामुळे आरोपी मेंढेने तिला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडून धोका होऊ शकतो, हे लक्षात आल्याने तरुणीने एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी धमकी देऊन विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.तिसरी घटना सायंकाळी ५.३० च्या सुमारास इमामवाड्यात घडली. अजनीच्या रेल्वे वसाहतीत राहणारा गुड्डू ऊर्फ सूरज कुंदन झरबडे आणि १९ वर्षीय युवतीचे प्रेमसंबंध आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला टोचून बोलतो. त्याचा असा छळ सुरू असतानाच त्याने सोमवारी सदर युवतीला मारहाण करून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. त्याच्याकडून होणारा छळ आणि अपमान असह्य झाल्याने युवतीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग