सीएमआरएस उपस्थितीत मेट्रो स्टेशनवर मॉक ड्रील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:55 IST2019-12-13T23:54:24+5:302019-12-13T23:55:00+5:30

हिंगणा मार्गावरील(रिच ३, अ‍ॅक्वा लाईन) मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाटी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनक कुमार गर्ग यांनी शुक्रवारी झाशी राणी मेट्रो मेट्रो स्टेशनची पाहणी करून प्रवाशांकरिता असलेल्या सुविधांचे निरीक्षण केले.

Mock drill at metro station in the presence of CMRS | सीएमआरएस उपस्थितीत मेट्रो स्टेशनवर मॉक ड्रील 

सीएमआरएस उपस्थितीत मेट्रो स्टेशनवर मॉक ड्रील 

ठळक मुद्दे झाशी राणी मेट्रो स्टेशनची पाहणी : सुविधांचे निरीक्षण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : हिंगणा मार्गावरील(रिच ३, अ‍ॅक्वा लाईन) मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाटी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनक कुमार गर्ग यांनी शुक्रवारी झाशी राणी मेट्रो मेट्रो स्टेशनची पाहणी करून प्रवाशांकरिता असलेल्या सुविधांचे निरीक्षण केले. सीएमआरएस पथकाने समाधान व्यक्त केले. पाहणीदरम्यान मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले.
सीएमआरएस अधिकाऱ्यांनी झाशी राणी मेट्रो स्टेशन येथून पाहणी दौरा सुरू केला. सुरुवात एस्केलेटरपासून केली. स्टेशनवरील विविध फलक आणि सुरक्षा नियमांची पाहणी केली. कुठल्याही संभाव्य आणीबाणीच्या परिस्थितीत करायच्या उपाययोजनांची समीक्षा केली. गर्ग यांच्या रिषभ द्विवेदी आणि इतर अधिकाऱ्यांनी स्टेशन नियंत्रण कक्षाची आणि सुविधांची पाहणी केली. तैनात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना मार्गदर्शन केले.
आगीसारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत नेमकी तयारी कशी असायला हवी, याचे परीक्षण करण्याकरिता मॉल ड्रीलचे आयोजन करण्यात आले. मनपाच्या अग्निशमन गाडीसोबतच लता मंगेशकर रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे १० मिनिटातच दोन्ही वाहने घटनास्थळी दाखल झाली. या दरम्यान पंप रूमचे निरीक्षण त्यांनी केले.
या प्रसंगी संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टोक व सिस्टीम) सुनील माथूर, कार्यकारी संचालक (रिच-१) देवेंद्र रामटेककर, कार्यकारी संचालक ( इलेक्ट्रिकल) गिरिधारी पौनीकर, कार्यकारी संचालक ( सिग्नल) जे पी डेहरीया, कार्यकारी संचालक (ट्रॅक) नरेश गुरबानी, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक (ओ अ‍ॅण्ड एम) सुधाकर उराडे, महाव्यवस्थापक (टेलिकॉम) आशिष संघी, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच-३) राजदीप भट्टाचार्य आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Mock drill at metro station in the presence of CMRS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.