..........
बाईक चालक युवकाला मारहाण
नागपूर : पारडीत बाईक चांगली चालव, असा सल्ला देऊन युवकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. भवानीनगर येथील रहिवासी गोविंद वाठ मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता आपला मित्र चरण किरपातेसोबत बाईकने घरी जात होते. पारडीच्या एचपी पेट्रोल पंपाजवळ बाईकवर स्वार दोन युवकांनी ओव्हरटेक करून गोविंदला थांबविले. त्यांनी चरणला बाईक चांगली चालव, असे सांगून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पारडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
.............
घरासमोर बसलेल्या युवकावर हल्ला
नागपूर : झिंगाबाई टाकळीत घरासमोर बसलेल्या युवकाला चाकू मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री १० वर्षाचा राहुल बबलू सोमेवार आपल्या मित्रासोबत घरासमोर बसला होता. त्याला वस्तीतील टुन्नी ऊर्फ मोनू शर्मा याने बाहेर का बसला घरात जा, असे सांगून चाकू मारून जखमी केले. मानकापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
................