शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...मग तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले? राज ठाकरेंनी साधला निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 14:01 IST

उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मतदानाचा अपमान केला असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मतदानाचा अपमान केल्याचे राज ठाकरे म्हणाले. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं ठरलं होतं तर तेव्हाच का नाही बोललात, अशी टीकाही त्यांनी केली. निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि मग यांना आठवलं. लोकांनी काय फक्त खेळ पाहत राहायचं का? दोन तास रांगेत, उन्हात उभं राहून मतदान करायचं आणि हे वाटेल तशी प्रतारणा करणार. त्यामुळे हा प्रश्न फक्त विदर्भापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्राचा आहे. ज्या लोकांनी मतदान केलं आहे, त्यांचा अपमान केला आहे. या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर घेऊन जाणं महत्त्वाचं आहे

राजकारणाची पातळी खालावण्यासाठी कोण जबाबदार? असा प्रश्न विचारण्यात आला असता, इतक्या प्रकारे अपमान केल्यानंतरही लोक जेव्हा त्यांनाच मतदान करतात, तेव्हा आपण केलं ते बरोबर आहे असं त्यांना वाटतं. लोकांनी यांना शासन करणं, निवडणुकीत धक्का देण्याची गरज आहे, तेव्हाच हे सुधारतील. जर अशाप्रकारे अपमान होत असेल तर वठणीवर आणलं पाहिजे, असे उत्तर राज ठाकरेंनी दिले.

सध्या राजकारणात वैयक्तिक टीका सर्वाधिक होतेय. राजकारण वैयक्तिक नसतं, वैचारिक धोणांवर टीका करतो, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. राजकरणात मी मोदींच्या धोरणावर टीका केली, मोदींवर कधीही वैयक्तिक टीका केलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच मनसेने मविआ सरकारचं कधीच कौतुक केलं नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात लढूनच पक्ष मोठा होत असतो, असेही ठाकरे म्हणाले. 

इतका गोंधळ, इतकी प्रतारणा आजपर्यंत पाहिलेली नाही 

महाराष्ट्राच्या राजकारणात मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा आजपर्यंत पाहिलेली नाही. कोण कोणासोबत जात आहे आणि कोण सत्ता स्थापन करत आहे, विरोधी पक्षात कोण बसत आहे यावर इतका गोंधळ मी इतक्या वर्षांच्या राजकारणात पाहिलेला नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

फॉक्सकॉन प्रकरणावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला यावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. राज ठाकरे यांनी यावर भाष्य करत एक प्रश्न उपस्थित केला. राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? फॉस्ककॉन प्रकरणाची चौकशी व्हावी, असे ठाकरे म्हणाले. या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी व्हावी. सत्य लोकांसमोर यायला हवं, असंही ते म्हणाले. गुजरातने कदाचित चांगली ऑफर दिली असावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :PoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरेFoxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डीलBJPभाजपाMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना