मनसेने नेमला दोन विधानसभांसाठी एक जिल्हाध्यक्ष; नागपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित
By कमलेश वानखेडे | Updated: June 23, 2023 18:31 IST2023-06-23T18:30:10+5:302023-06-23T18:31:06+5:30
Nagpur News महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नागपूर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून दोन विधानसभा मतदारसंघासाठी एक जिल्हाध्यक्ष नेमण्यात आला आहे.

मनसेने नेमला दोन विधानसभांसाठी एक जिल्हाध्यक्ष; नागपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित
कमलेश वानखेडे
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नागपूर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून दोन विधानसभा मतदारसंघासाठी एक जिल्हाध्यक्ष नेमण्यात आला आहे. जिल्हाध्यक्षांच्या मदतीला उपजिल्हाध्यक्ष, विधानसभा सचिव तसेच तालुका अध्यक्ष यांना कामाची विभागणी करून देण्यात आली. विशेष म्हणजे पक्षातील जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
रामटेक व उमरेड विधानसभा जिल्हाध्यक्ष पदी रामटेक येथील शेखर दुंडे तर जिल्हा संघटक पदी उमरेड सचिन नागपुरे तसेच सावनेर व कामठी विधानसभा जिल्हाध्यक्ष पदी खापरखेडा येथील जयंत चव्हाण तर जिल्हा संघटक पदी कळमेश्वर चे स्वप्नील चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. काटोल व हिंगणा विधानसभेसाठी काटोल रहीवासी दिलीप गायकवाड यांचेकडे जिल्हा संघटक पदाची जवाबदारी सोपविण्यात आली.
जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटक यांच्या मदतीला प्रत्येक विधानसभेसाठी विधानसभा, जिल्हा सचिव, दोन उपजिल्हाध्यक्ष, प्रत्येक तालुकानुसार तालुकाध्यक्ष देण्यात आले. त्याखालील पदरचनेची जवाबदारी व नियुक्ती जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटक व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांच्याकडे देण्यात आली असून एक महिन्यात शाखा अध्यक्ष, गटशाखा अध्यक्ष व राजदूतांपर्यंत संपूर्ण बांधणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियुक्ती कार्यक्रमात नागपूर शहर अध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे घनश्याम निखाडे, श्याम पुनियानी आदी उपस्थित होेते.
नवनियुक्त कार्यकारिणी खालील प्रमाणे
हिंगणा व काटोल विधानसभा :
१)आदित्य दुरुगकर ( जिल्हाध्यक्ष),
२) दिलीप गायकवाड ( जिल्हा संघटक)
३) अनिल पारखी - जिल्हा उपाध्यक्ष (हिंगणा वि.स.)
४) श्री. रितेश कान्होलकर - जिल्हा उपाध्यक्ष (काटोल वि.स.)
५) श्री. अजय सिरसवार - जिल्हा सचिव (हिंगणा)
६) श्री. दीपक ठाकरे - तालुका अध्यक्ष (नागपूर ग्रामीण)
७)श्री. सचिन चीटकुले - तालुका अध्यक्ष (हिंगणा)
८) श्री. साहिल ढोकणे - तालुका अध्यक्ष (नरखेड)
९) श्री. अनिल नेहारे - तालुका अध्यक्ष (काटोल)
सावनेर व कामठी विधानसभा
१) श्री. जयंत चौव्हाण - जिल्हाध्यक्ष (सावनेर व कामठी)
२) श्री. स्वप्नील चौधरी - जिल्हा संघटक (सावनेर व कामठी)
रामटेक व उमरेड विधानसभा
१) श्री. शेखर दुंडे - जिल्हाध्यक्ष (रामटेक व उमरेड)
२) श्री. सचिन नागपूरकर - जिल्हा संघटक (रामटेक व उमरेड)
३) श्री. रोशन फुलझेले - जिल्हा उपाध्यक्ष (पारशिवणी)
४) श्री. सुनील सहारे - जिल्हा उपाध्यक्ष (उमरेड)
५) श्री. डॅनी धानुरे - तालुका अध्यक्ष (पारशिवणी)
६) श्री. सेवक बेलसरे - तालुका अध्यक्ष (रामटेक)
७) श्री. भूषण पोरकुट - तालुका अध्यक्ष (उमरेड)
८) श्री. राकेश पौनिकर - तालुका अध्यक्ष (भिवापूर)
शेतकरी सेना
१) श्री. सुरेश वांदीले - जिल्हाध्यक्ष (रामटेक, उमरेड, कामठी वि.स.)