नागपूरच्या आमदार निवासात आमदार ज्योती कलानी यांच्या स्वीय सचिवांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 13:18 IST2018-07-03T12:21:58+5:302018-07-03T13:18:43+5:30
मुंबईतील उल्हासनगरच्या आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे स्वीय सचिव विनोद अग्रवाल यांचा मृतदेह नागपुरातील आमदार निवासच्या मधल्या इमारतीतील खोली क्र. ६४ मध्ये मंगळवारी सकाळी आढळून आला.

नागपूरच्या आमदार निवासात आमदार ज्योती कलानी यांच्या स्वीय सचिवांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मुंबईतील उल्हासनगरच्या आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे स्वीय सचिव विनोद अग्रवाल यांचा मृतदेह नागपुरातील आमदार निवासच्या मधल्या इमारतीतील खोली क्र. ४६ मध्ये मंगळवारी सकाळी आढळून आला. ही खोली आमदार रमेश लटके यांच्या नावाने नोंदविली असून, विनोद अग्रवाल हे लटके यांच्या खोलीत झोपले होते. प्राथमिक पाहणीत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनच्या एक दिवस आधी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
आमदार निवासात सध्या आमदारांच्या स्वीय सचिव व अन्य कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे. मंगळवारी सकाळी खोली क्र. ४६ मध्ये विनोद अग्रवाल हे मृतावस्थेत आढळले. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.