शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

राजद्रोहाच्या कलमाचा सरकारकडून गैरवापर : अरुण शौरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 9:43 PM

मागील काही काळापासून नियोजनबद्ध पद्धतीने प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे दमन करण्यात येत आहे. जर राज्यकर्त्यांच्या विरोधात एखादी बाब उघडकीस आणली तर थेट राजद्रोहाचाच गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पत्रकारांच्या लेखणीला दाबण्यासाठी सरकारकडून राजद्रोहाच्या कलमांचा गैरवापर करण्यात येत आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी लावला आहे. शुक्रवारी नागपुरात ‘अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार-२०१७’चे वितरण करण्यात आले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देद्वादशीवार, बावीस्कर, निरगुडकरांचा अरविंदबाबू देशमुख पुरस्कारांनी सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून नियोजनबद्ध पद्धतीने प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे दमन करण्यात येत आहे. जर राज्यकर्त्यांच्या विरोधात एखादी बाब उघडकीस आणली तर थेट राजद्रोहाचाच गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पत्रकारांच्या लेखणीला दाबण्यासाठी सरकारकडून राजद्रोहाच्या कलमांचा गैरवापर करण्यात येत आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी लावला आहे. शुक्रवारी नागपुरात ‘अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार-२०१७’चे वितरण करण्यात आले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बावीस्कर व ‘न्यूज १८-लोकमत’चे समूह संपादक डॉ.उदय निरगुडकर यांना अनुक्रमे मुद्रित व ‘इलेक्ट्रॉनिक’ माध्यमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय सुनिल चावके, निशांत सरवणकर, विजय गायकवाड, रामराव जगताप, न.मा.जोशी, दीपा कदम या पत्रकारांचादेखील गौरव करण्यात आला. माजी मंत्री रणजित देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते व सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपुरकर हे विशेष अतिथी होते. यावेळी अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ.आशीष देशमुख व कार्यवाही जवाहर चरडे हेदेखील उपस्थित होते. आजच्या तारखेत लोकशाहीच्या चारही स्तंभांवर आतून व बाहेरुन प्रहार होत आहेत. सरकार कुणाचीही असली तरी देशाला एक अदृश्य सरकार संचालित करत असते. देशातील उद्योगपतींची ही अदृश्य सरकार असते व सत्तास्थानी कुणीही आले तर खरी सूत्रे त्यांच्याकडेच असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे किंवा पत्रकारांचा आवाज दाबणे हे प्रकार या पडद्यामागील सरकारच्या इशाऱ्यावरुन होत असतात, असा आरोप शौरी यांनी केला. पत्रकारितेची विश्वासार्हता घटत आहे. अशा स्थितीत पत्रकारितेवर जनतेचा विश्वास टिकवून ठेवणे हे आव्हानच आहे. यासाठी देशातील सर्वच पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. संपादकांनी प्रामाणिक पत्रकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पत्रकारांनी जनतेच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या सार्वजनिक समस्यांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्याचप्रमाणे राजकारणी असो किंवा प्रशासनातील कुठला अधिकारी त्यांच्याशी एक अंतर ठेवूनच राहिले पाहिजे, असा सल्ला अरुण शौरी यांनी दिला. आशीष देशमुख यांनी प्रास्ताविक केले. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.पत्रकारांनीच विश्वसनीयता टिकवली पाहिजेसत्तेला सत्य कधीच आवडत नाही तर केवळ सोय चांगली वाटते. अशा स्थितीत पत्रकारांची दोरीवरची कसरत सुरू असते. मात्र जनतेला प्रामाणिक व अप्रामाणिक असा फरक कळतो व पत्रकारांनीच विश्वसनीयता टिकविली पाहिजे, असे मत सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. राजकारण्यांचा पत्रकारांकडे पाहण्याचा ‘दृष्टिकोन’ सर्वश्रुतच आहे. अशा स्थितीत पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन विजय बावीस्कर यांनी केले. बदलत्या काळात नवीन माध्यमांचा उपयोग वाढतो आहे. ‘सोशल मीडिया’वर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे नेमके सत्य जाणून घेणे अवघड झाले आहे, असे उदय निरगुडकर म्हणाले.देशाचे पंतप्रधान, मंत्री अज्ञानीयावेळी ‘नीती’ आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यशैलीवर टीका करत अरुण शौरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील टीका केली. देशाचे पंतप्रधान व मंत्री अज्ञानी असतील तर ‘नीती’ आयोगावरदेखील मूर्ख लोकच बसतील, असा टोला शौरी यांनी लगावला.

 

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर