सुधाकर देशामुखांकडून राजमुद्रेचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 21:21 IST2020-07-18T21:18:06+5:302020-07-18T21:21:28+5:30

राजमुद्रा असलेल्या लेटर पॅडचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून भाजपाचे माजी आमदार सुधाकरराव देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Misuse of national emblem by Sudhakar Deshmukh | सुधाकर देशामुखांकडून राजमुद्रेचा गैरवापर

सुधाकर देशामुखांकडून राजमुद्रेचा गैरवापर


लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : राजमुद्रा असलेल्या लेटर पॅडचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून भाजपाचे माजी आमदार सुधाकरराव देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
राजकीय नेत्यांसोबत सलगी असल्याचे दाखवून अनेकांच्या मालमत्ता हडपणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याच्या प्रकरणावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार सुधाकरराव देशमुख यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले. हे पत्र शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. विधानसभेचे चित्र आणि राजमुद्रा असलेल्या लेटरपॅडवर देशमुख यांनी हे पत्र लिहिल्यामुळे त्यांनी अधिकार नसताना लेटरपॅडचा गैरवापर केला, असा आरोप करणारी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी सीताबर्डी ठाण्यात शुक्रवारी रात्री केली. वरिष्ठांसोबत सल्लामसलत केल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी मध्यरात्री याप्रकरणी ‘अदखलपात्र गुन्हा’ अशी नोंद घेत प्रकरण चौकशीत ठेवले आहे.

Web Title: Misuse of national emblem by Sudhakar Deshmukh