शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी हायकोर्टात धाव :  बलात्कार पीडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:05 PM

वडिलाच्या मित्राने बलात्कार केल्यामुळे गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन मुलीने गर्भपाताची परवानगी मिळण्यासाठी मुुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वडिलाच्या मित्राने बलात्कार केल्यामुळे गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन मुलीने गर्भपाताची परवानगी मिळण्यासाठी मुुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. मुलगी २३ आठवड्याची गर्भवती आहे.उच्च न्यायालयाने गुरुवारी प्रकरण ऐकल्यानंतर मुलीच्या आवश्यक तपासण्या करण्यासाठी पाच डॉक्टर्सचे वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिला. या मंडळात गायनॉकॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, कॉर्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट व पॅथॉलॉजिस्टचा समावेश असणे आवश्यक आहे. तसेच, मंडळ सदस्यांमध्ये दोन महिला डॉक्टर असाव्यात असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.पीडित मुलीला ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मंडळापुढे हजर करावे. मंडळाने तिच्या आवश्यक तपासण्या करून ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतापूर्वी अहवाल सादर करावा, असेही न्यायालयाने सांगितले. प्रकरणावर न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे. पीडित मुलीतर्फे अ‍ॅड. स्विटी भाटिया यांनी कामकाज पाहिले..आरोपीविरुद्ध गुन्हा दाखलपीडित मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव येथील असून ती १२ वर्षे ४ महिने वयाची आहे. तिच्या वडिलाचा मित्र आरोपी योगेश रामचंद्र दोहतारे याने तिच्यावर बलात्कार केला अशी तक्रार १४ मार्च २०२० रोजी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कारAbortionगर्भपात