अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 21:47 IST2018-08-03T21:44:27+5:302018-08-03T21:47:04+5:30
विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्षाचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. एस. दास यांनी हा निर्णय दिला. ही घटना कोतवाली पोलिसांच्या हद्दीतील आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्षाचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. एस. दास यांनी हा निर्णय दिला. ही घटना कोतवाली पोलिसांच्या हद्दीतील आहे.
बाबुराव मोतीराम पंच (५५) असे आरोपीचे नाव असून तो गायत्रीनगर येथील रहिवासी आहे. आरोपीने १५ एप्रिल २०१८ रोजी हे नात्यातील विश्वासाला काळीमा फासणारे कूकृत्य केले. त्यावेळी पीडित मुलगी १६ वर्षांची होती. तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मंगला हरडे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. ज्योती वजानी व अॅड. राजेंद्र मेंढे यांनी कामकाज पाहिले.
चोरट्याला कारावास
सत्र न्यायालयाने शुक्रवारी नवीननगर येथील चोरटा रोहित बलदेव बावणकर (३०) याला ६ महिने कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एम. टी. खराटे यांनी हा निर्णय दिला. चेतना दखणे असे फिर्यादीचे नाव आहे. ८ आॅगस्ट २०१७ रोजी आरोपीने चेतना यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न केला होता. तहसीलचे पोलीस हवालदार मारोती काचोरे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. व्ही. डी. हुकरे यांनी बाजू मांडली.