शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड परिसरातील खाणपट्ट्यांची चौकशी

By admin | Updated: December 25, 2014 00:29 IST

उमरेड व भिवापूर तालुक्यात खाणपट्ट्यांमध्ये झालेल्या उत्खननाची विभागीय आयुक्त व खनिकर्म अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. चौकशीत परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याचे

महसूलमंत्र्यांची घोषणा : हिंगण्यातही मोक्का तपासणीनागपूर : उमरेड व भिवापूर तालुक्यात खाणपट्ट्यांमध्ये झालेल्या उत्खननाची विभागीय आयुक्त व खनिकर्म अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. चौकशीत परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याचे आढळले तर संबंधित खाणपट्ट्याची परवानगी रद्द करून व दंडही आकारला जाणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधानसभेत यासंबंधीची घोषणा केली. दगडखाणीत अवैध उत्खनन करून लाखोंची माया जमविणाऱ्या खाण लॉबीला हा मोठा दणका मानला जात आहे. आ. सुधीर पारवे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करीत त्यांच्या मतदारसंघातील उमरेड व भिवापूर तालुक्यात खाणपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उत्खनन होत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. पारवे म्हणाले, उमरेड व भिवापूर तालुक्यात मौजा पाचगाव, सुरगाव, चिमणाझरी, मटकाझरी, पारडगाव, सायकी, मोहपा, धुरखेडा, कुंभारी, कवडसी, बरड, चारगाव (गोटाळी), मांगरुळ, गरडापार येथे मोठ्या प्रमाणात दगड खाणी असून, काहींनी परवानगी मिळालेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागेवर उत्खनन केले आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. या खाणींची उच्चस्तरीय चौकशी करून पट्ट्यांची मोजणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर महसूलमंत्री खडसे यांनी चौकशीचे आदेश दिले.आ. समीर मेघे यांनी हिंगण्यातील राजीवनगर परिसरात अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार करीत चौकशीची मागणी केली. यावर संबंधित जागेची मोक्का तपासणी करण्याचे आदेश खडसे यांनी दिले. रॉयल्टीपासून मिळणारा निधी संबंधित जिल्ह्यातच खर्च व्हावा, अशी मागणी आ. आशिष देशमुख यांनी केली असता, सरकार रॉयल्टीचा काही भाग संबंधित जिल्ह्यांनाच देत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)