शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘एजी एन्व्हायरो’वर लागेल लाखोंचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 22:32 IST

कचऱ्याच्या गाडीत माती भरून भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये टाकत असल्याप्रकरणी मनपाने कारवाईची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात कचरा संकलन करणाऱ्या ‘एजी एन्व्हायरो’ कंपनीच्या महिन्याच्या बिलातून १० टक्के रक्कम दंडाच्या रूपात कपात करण्यात येईल. अप्पर आयुक्त राम जोशी यांनी प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठविला आहे.

ठळक मुद्देकचऱ्याच्या गाडीत माती आढळल्याचे प्रकरण : समितीने कारवाईची केली शिफारस

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कचऱ्याच्या गाडीत माती भरून भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये टाकत असल्याप्रकरणी मनपाने कारवाईची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात कचरा संकलन करणाऱ्या ‘एजी एन्व्हायरो’ कंपनीच्या महिन्याच्या बिलातून १० टक्के रक्कम दंडाच्या रूपात कपात करण्यात येईल. अप्पर आयुक्त राम जोशी यांनी प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठविला आहे. सूत्रांच्या मते, वारंवार येत असलेल्या तक्रारीवरून वरिष्ठ अधिकारी कंपनीवर दंड लावण्याच्या बाजूने आहे.२८ जून रोजी आमदार विकास ठाकरे यांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या बाहेर मातीने भरलेल्या तीन कचरागाड्यांना पकडले. या प्रकरणात जोशी यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठित करण्यात आली. कंपनीने संबंधित गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध पोलिसात तक्रारदेखील करण्यात आली. जोशी यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. किती दंड आकारावा हा अधिकार आयुक्तांकडे असल्याने, कारवाईची फाईल त्यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. आयुक्त यावर काय निर्णय घेतात, हे बघायचे आहे. जर दंड आकारण्यात आला तर झोन क्रमांक १ ते ५ मध्ये कचरा संकलनाचे काम बघणाऱ्या कंपनीवर २५ ते ३० लाख रुपये दंड आकारण्यात येऊ शकतो. दर महिन्याला कंपनीचे २.५ ते ३ कोटी रुपयांचे बिल निघते.याबाबत अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कार्यालयीन बैठकीत ते व्यस्त होते. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘एजी एन्व्हायरो’वर कारवाई होण्याची शक्यता आहे.आतापर्यंत ६० प्रकरणे आली समोरभांडेवाडीतील वजनकाट्यावर ज्या वाहनात कचऱ्याबरोबर मातीही असेल, अशा वाहनांना यादीतून काढण्यात येते. असे ६० वाहन समोर आले आहे. ‘एजी एन्व्हायरो’ कंपनीबद्दल तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने दंड आकारण्याबाबत शिफारस केली आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी कंपनीकडून होत असलेल्या त्रासामुळे संपही पुकारला होता.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न