शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

By admin | Updated: April 26, 2015 02:17 IST

जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील येरखेडा, रनाळा, भिलगाव, खसाळा, गोधनी, सावनेर, सावनेर तालुक्यातील खापरखेडा, चनकापूर, सिल्लेवाडा, भानेगाव, दहेगाव (रंगारी),

नागपूर : जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील येरखेडा, रनाळा, भिलगाव, खसाळा, गोधनी, सावनेर, सावनेर तालुक्यातील खापरखेडा, चनकापूर, सिल्लेवाडा, भानेगाव, दहेगाव (रंगारी), वलनी तसेच पारशिवनी तालुक्यातील कन्हान येथे शनिवारी सकाळी ११.४५ ते दुपारी १२.२० वाजताच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळे या गावांमधील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूूकंपाच्या धक्क्याची अधिकृत नोंद नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.कोराडीनजीकच्या गोधनी येथे सकाळी ११.५० वाजताच्या भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती महाजन कॉम्प्लेक्सचे संचालक संदीप इंगोले यांनी दिली. आपण कार्यालयात बसलो असता, खुर्ची हलल्याचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. भीतीपोटी या कॉम्प्लेक्समधील नागरिक घराबाहेर पडले होते. दाढी करीत असताना आरसा हलल्याची माहिती गोधनी येथील अमित पाथरे यांनी दिली. कामठी तालुक्यातील भिलगाव, खसाळा, न्यू येरखेडा, रनाळा येथे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे काहींनी सांगितले. घरी पेपर वाचत असताना सकाळी ११.५० वाजताच्या सुमारास खुर्ची हालल्याचा अनुभव आल्याची माहिती न्यू येरखेडा येथी सुषमा राखडे आणि रनाळा येथील रजनी ठवकर यांनी दिली. भूकंपाचे कंपन जाणवल्याची माहिती भिलगाव येथील सुमन विहार वसाहतीतील रहिवासी शिवचरण शंभरकर व खसाळा येथील झी स्कूलचे शाखा व्यवस्थापक विलास कार्लेकर यांनी दिली. कार्यालयात कंपन आल्याची माहिती कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी दिली. दरम्यान, घरातील रॅकमधील भांड्यांना कंपन आल्याचे छावणी परिसरातील सीमा यादव व रचना बिल्लरवार यांनी सांगितले. या भूकंपाच्या वृत्ताला कामठीचे तहसीलदार डी. एस. भोयर यांनी दुजोरा दिला असून, अधिकृत नोंद नसल्याचे सांगितले. सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथील सप्तश्रृंगी माता मंदिर परिसर, प्रकाशनगर कॉलनी तसेच चनकापूर भागात शनिवारी सकाळी ११.४० वाजताच्या सुमाराससौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. सदर धक्के ४० सेकंदापर्यंत अनुभवल्याची माहिती काहींनी दिली. काहींनी घरातील भांडी हलल्याची तर काहींनी रोडवर चालताना भोवळ आल्यासारखे वाटल्याचे सांगितले. त्यामुळे या भागातील नागरिक लगेच घराबाहेर पडले होते. कन्हान शहरात शनिवारी सकाळी ११.४८ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांसह व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान, शहरातील गणेशनगर, हनुमाननगर, तारसा चौक, डॉ. आंबेडकर चौक या भागात भूकंपाचे धक्के अनुभवल्याची माहिती मधू जयस्वाल, जगमोहन कपूर, प्रशांत पाटील यांच्यासह अन्य नागरिकांनी दिली. (प्रतिनिधी)