जून २०१९ मध्ये नागपुरातील हिंगणा मार्गावर धावणार मेट्रो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:42 IST2018-07-04T00:41:08+5:302018-07-04T00:42:36+5:30
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गतचे विकास कार्य निश्चित वेळेत पूर्ण होत आहे. याच शृंखलेत मुंजे चौक ते लोकमान्यनगरपर्यंत रिच-३ चे काम वेगात पूर्ण करण्यात येत असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०१९ पर्यंत ट्रायल रन सुरू होणार असल्याचा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.

जून २०१९ मध्ये नागपुरातील हिंगणा मार्गावर धावणार मेट्रो
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गतचे विकास कार्य निश्चित वेळेत पूर्ण होत आहे. याच शृंखलेत मुंजे चौक ते लोकमान्यनगरपर्यंत रिच-३ चे काम वेगात पूर्ण करण्यात येत असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०१९ पर्यंत ट्रायल रन सुरू होणार असल्याचा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.
हिंगणा मेट्रो मार्गावर सुभाषनगर स्टेशनवर टेलिकॉम इक्विपमेंट रूम (टीईआर), सिग्नलिंग इक्विपमेंट रूम (एसईआर), यूपीएस बॅटरी रूम, अॅन्सिलरी सबस्टेशन उपकेंद्र (एएसएस), भूमिगत वॉटर टँक आणि पंप केंद्र कक्षाचे उद्घाटन दीक्षित यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
दीक्षित म्हणाले, सहा महिन्यात सुभाषनगर स्टेशनचे काम पूर्ण होताच ट्रायल रनवर भर राहणार आहे. अंबाझरी तलावाचा किनारा असल्यामुळे हे क्षेत्र प्रवाशांसोबत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. रिच-३ मधील स्टेशन थीमच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे.
सुभाषनगर आणि अंबाझरी मेट्रो स्टेशनदरम्यान जवळपास एक कि़मी.ची गॅलरी राहील. आठ मीटर रुंद प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला काच लावण्यात येणार आहे. ते पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. दीक्षित म्हणाले, विश्वस्तरीय गुणवत्तेच्या स्टेशनच्या उभारणीसह गुणवत्तेवर लक्ष देण्यात येत आहे. देशविदेशातील नऊ कंपन्या कार्यरत आहेत. एक वर्षाच्या परिश्रमानंतर सुभाषनगर स्टेशन प्रवासी आणि तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंवर साकार झाले आहे. बांधकाम पूर्ण होताच एक रॅक हिंगणा मार्गवर ट्रायलकरिता आणण्यात येईल. एका प्रश्नाच्या उत्तरात दीक्षित म्हणाले, एअरपोर्ट प्राधिकरणांच्या नियमांचे पालन करण्यात आले आहे. महामेट्रोला स्पेशल प्लॅनिंग अॅथॉरिटीचा दर्जा मिळाल्यामुळे कार्य सुरळीत झाले आहे.
प्रारंभी दीक्षित यांनी विधिवत पूजा करून कक्षाचे उद्घाटन केले. यावेळी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक निदेशक सुनील माथूर, वित्त संचालक एस. शिवमाथन, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.