शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी, न्यू-नागपूरपर्यंत ‘मेट्रो’चा विस्तार, इनर रिंगरोडदेखील होणार ‘कनेक्ट’

By योगेश पांडे | Updated: February 9, 2026 18:21 IST

नितीन गडकरी : डीपीआर तयार करण्याच्या कामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत शहरात मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. मात्र भविष्यातील गरजा लक्षात घेता मेट्रोचा आणखी विस्तार करण्यासाठी तिसऱ्या टप्प्याची योजना आखण्यात आली आहे. याअंतर्गत कोराडी, न्यू नागपूरपर्यंत मेट्रोचा विस्तार होईल. तसेच इनर रिंगरोडवरदेखील मेट्रो धावेल अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सोमवारी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

नागपुरातील मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याबाबत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक झाली. या टप्प्यात नागपूर ते कोराडी या ११.५ किमी, बुटीबोरी एमआयडीसी ते सीएट लिमीटेड या ३ किमी व खापरी ते न्यू नागपूर या १५ किमीच्या मार्गाचा समावेश असेल. तसेच इनर रिंगरोडवरदेखील मेट्रो धावेल. या कामांचे डीपीआर तयार करण्याबाबत निविदा प्रकाशित करण्यात आली आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

कुठल्याही देशाच्या विकासदर वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास सर्वात महत्त्वाचा असतो. आयात निर्यातीमध्ये लॉजिस्टिकचा खर्च महत्त्वाचा ठरतो. चीनमध्ये हा खर्च ८ टक्के आहे, युरोप-अमेरिकेत १२ टक्के आहे. तर आपल्या देशात हा खर्च १४ ते १६ टक्के आहे. मात्र केंद्राच्या प्रयत्नांमुळे लॉजिस्टिक खर्च ५ ते ६ टक्क्यांनी कमी होऊन ९ टक्क्यांवर आला. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी १२.२० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रोजगार निर्मिती करणारी अर्थव्यवस्था ही आजच्या काळातील सर्वात मोठी आवश्यकता आहे. त्यावरदेखील अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

बुद्ध सर्किटसाठी चार हजार ई-बसेस

पुर्वोत्तरमधील सहा राज्यांमध्ये पाच बुद्ध सर्किट तयार करण्यात आले आहे. या सर्किटदरम्यान चार हजार इलेक्ट्रीक बसेस चालविण्यात येतील. या पर्यावरण पूरक असतील व रोजगारनिर्मितीदेखील होईल, असे गडकरी यांनी सांगितले.

नागपुरात सी प्लेन उडणार का ?

अंबाझरीतून मुंबईत व मुंबईतून रामटेकमधील खिंडसीपर्यंत सी-प्लेन चालविण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्याबाबत गडकरी यांनी पत्रपरिषदेत भाष्य केले. देशात सी प्लेन सेवा सुरू व्हावी यासाठी ‘व्हीजीएफ’ (व्हायबिलिटी गॅप फंड) योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशात सी प्लेन सेवा सुरू होईल व पर्यटनाला चालना मिळेल, असा दावा गडकरी यांनी केला. मात्र यात नागपुरचा समावेश असेल का हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

राज्यातील १२८ रेल्वे स्थानकांचा विकास

अमृत भारत योजनेअंतर्गत राज्यातील १२८ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. त्यात नागपूर, अजनी, अकोला, आमगाव, अमरावती, बडनेरा, बल्लारपूर, भंडारा मार्ग, चंद्रपूर, धामणगाव, गोधनी, गोंदिया, हिंगणघाट, इतवारी, कामठी, काटोल, किनवट, मलकापूर, मूर्तीजापूर, नांदगाव, नांदुरा, नंदुरबार, नरखेड, पुलगाव, सेलू,सेवाग्राम, शेगाव, तळेगाव, तुमसर मार्ग, वडसा, वर्धा, वाशीम, चांदा फोर्ट या विदर्भातील स्थानकांचा प्रामुख्याने समावेश आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Metro Expansion: Koradi, New Nagpur Connectivity & Inner Ring Road

Web Summary : Nagpur Metro's third phase expands to Koradi, New Nagpur, and the inner ring road. DPR tenders are out. Focus on infrastructure development with 12.20 lakh crore allocation. Buddhist circuit to get 4000 e-buses. 128 state railway stations will be developed.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर