मेट्रो रेल्वे : अॅक्वा लाईनवर ‘सीएमआरएस’चे परीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 22:52 IST2019-09-03T22:52:05+5:302019-09-03T22:52:45+5:30
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या रिच-३ अॅक्वा लाईनवर मंगळवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) परीक्षण केले. पहिल्या दिवशी हिंगणा मार्गावरील मेट्रो डेपो आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली.

मेट्रो रेल्वे : अॅक्वा लाईनवर ‘सीएमआरएस’चे परीक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमेट्रो प्रकल्पाच्या रिच-३ अॅक्वा लाईनवर मंगळवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) परीक्षण केले. पहिल्या दिवशी हिंगणा मार्गावरील मेट्रो डेपो आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली.
हिंगणा डेपोत रोलिंग स्टॉक रूम, डेली रिपोर्ट, ट्रेन व्हॉल मशीन, डेपो कंट्रोल रूम, मेट्रो रूट मॅप, सिग्नलिंग, ट्रेन मुव्हिंग प्लान इत्यादी उपकरणांची पाहणी केली. सीएमआरएसच्या चार सदस्यीय पथकाचे नेतृत्त्व जनक कुमार गर्ग यांनी केले. अन्य तीन अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी के. एल. पुर्थी, विवेक वाजपेयी आणि ऋषभ कुमार सहभागी होते. हे अधिकारी बुधवारीही पाहणी करणार आहेत.
दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या कागदपत्रांची पाहणी करून रोलिंग स्टॉकचे निरीक्षण केले. यात मेट्रोच्या इमर्जन्सी फ्रंट डोअर व सुरक्षा उपकरणांची तपासणी केली. हिंगणा डेपो येथे डेपो, रेलिंग स्टॉक व प्रवासी सुविधेबद्दल सादरीकरण केले आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची भेट घेतली. संपूर्ण दिवस चाललेल्या पाहणी दौऱ्यात महामेट्रोचे संचालक(प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, संचालक (वित्त) एस शिवमाथन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.