अॅक्वा लाईनवर आता सकाळी ६.३० पासून मेट्रो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 21:55 IST2021-02-22T21:07:37+5:302021-02-22T21:55:03+5:30
Aqua Line Metro महामेट्रो २२ फेब्रुवारीपासून अॅक्वा लाइनवर सकाळी ६.३० वाजेपासून मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करणार आहे. ही सेवा आतापर्यंत सकाळी ८ पासून सुरू करण्यात येत होती.

अॅक्वा लाईनवर आता सकाळी ६.३० पासून मेट्रो
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनपर्यंतच्या अॅक्वा लाइन परिसरातील शैक्षणिक संस्था आणि इतर कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. महामेट्रो २२ फेब्रुवारीपासून अॅक्वा लाइनवर सकाळी ६.३० वाजेपासून मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करणार आहे. ही सेवा आतापर्यंत सकाळी ८ पासून सुरू करण्यात येत होती. सकाळच्या वेळी शाळा, महाविद्यालय आणि नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांना या निर्णयामुळे नक्कीच फायदा होणार आहे. या मार्गावरील अनेक नागरिकांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांना सकाळी ६.३० पासून मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार अॅक्वा लाइनवर आता सकाळी ६.३० पासून मेट्रो रेल्वेची सेवा सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अॅक्वा लाइनवर दर १५ मिनिटांनी दोन्ही बाजूंनी ही सेवा सुरू राहणार आहे.