शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

नागपुरातील क्वारंटाईन केंद्र असलेल्या आमदार निवासात जेवणावरुन गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:06 AM

संस्थात्मक ‘क्वारंटाईन’ केंद्र असलेल्या आमदार निवासातील जेवण व नाश्त्याचे कंत्राट संपल्याने क्वॉरंटाईन असलेल्या संशयितांना रविवारी सकाळी ८ वाजता दिला जाणारा नाश्ता सकाळी ११ वाजता तर दुपारचे १२ वाजताचे जेवण सायंकाळी ४ वाजता मिळाले. या प्रकारावरून आमदर निवासात चांगलाच गोंधळ उडाला.

ठळक मुद्देदुपारचे जेवण दिले ४ वाजताजेवणाचा कंत्राटदार बदलला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संस्थात्मक ‘क्वारंटाईन’ केंद्र असलेल्या आमदार निवासातील जेवण व नाश्त्याचे कंत्राट संपल्याने क्वॉरंटाईन असलेल्या संशयितांना रविवारी सकाळी ८ वाजता दिला जाणारा नाश्ता सकाळी ११ वाजता तर दुपारचे १२ वाजताचे जेवण सायंकाळी ४ वाजता मिळाले. या प्रकारावरून आमदर निवासात चांगलाच गोंधळ उडाला.आमदार निवासात ४५० हून अधिक संशयित ‘क्वॉरंटाईन’ आहेत. यांच्या दोन वेळचे जेवण, दोन वेळचा नाश्ता व चहाचे कंत्राट आमदार निवासातील कंत्राटदाराला देण्यात आले होते. परंतु आज या कंत्राटदाराचे कंत्राट संपले. यामुळे सकाळचा नाश्ता व जेवणाचे कंत्राट दुसऱ्या पुरवठादाराला देण्यात आले. परंतु पहिल्याच दिवशी त्याने उशीर केला. येथे ‘क्वारंटाईन’ असलेल्या एकाने ‘लोकमत’ला फोन करून सांगितले, सकाळचा ८ वाजता मिळणारा नाश्ता १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान मिळाला. हा नाश्ता अस्वच्छ वाहनातून आणण्यात आला होता. त्याचा दर्जा चांगला नव्हता. जुना कंत्राटदार प्रत्येकाच्या खोलीपर्यंत जेवण नेऊन द्यायचा, परंतु नव्या कंत्राटदाराने खालीच नाश्त्याचे साहित्य ठेवल्याने अनेकांना अडचणीचे गेले. याला घेऊन गोंधळ उडाला. यामुळे येथील अधिकाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. शीघ्र कृती पथकही तैनात करण्यात आले. दुपारचे जेवणही ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान आले. खोलीत पोहचायलाही बराच वेळ लागला.या संदर्भात उपविभागीय अधिकारी शेखर गाडगे म्हणाले, जुन्या कंत्राटदाराचे दर खूप जास्त होते. यामुळे आजपासून नवीन कंत्राटदार नेमण्यात आला. परंतु त्याला सेवा देणे शक्य होत नसल्याचे दिसून आले. त्याच्याकडून सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण देण्यात आले. यात थोडा उशीर झाला. यामुळे हा कंत्राटदार बदलवून नव्या कंत्राटदाराला नाश्ता, चहा, व भोजनाचे कंत्राट देण्यात आले. आता सर्वकाही सुरळीत असल्याचेही गाडगे म्हणाले.स्वच्छता व पाण्याची समस्याआमदार निवासात ‘क्वारंटाईन’ असलेल्या दोन युवकांनी एक व्हिडीओ व्हायरल करून येथे पाण्याची समस्या असल्याचे सांगितले. तसेच सफाई नियमित होत नसल्याचीही तक्रार केली. विशेष म्हणजे, नमुन्याचा अहवाल लवकर मिळत नाही. जे पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत त्यांचा अहवालाही उशिरा येत असल्याने त्यांच्यापासून इतरांना लागण होण्याची भीती असल्याचेही त्यांनी व्हिडीओत म्हटले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस