नागपुरात पारा आणखी घसरणार, थंडी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:04 IST2020-12-18T23:02:46+5:302020-12-18T23:04:15+5:30
Cold increase , nagpur news नागपुरात गेल्या २४ तासात रात्रीचे तापमान १.२ डिग्रीने खाली घसरले असून ते १६.३ डिग्री सेल्सियसवर पोहोचले आहे. पुढील ४८ तासात दोन ते तीन डिग्री पारा आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने थंडी वाढणार आहे.

नागपुरात पारा आणखी घसरणार, थंडी वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात गेल्या २४ तासात रात्रीचे तापमान १.२ डिग्रीने खाली घसरले असून ते १६.३ डिग्री सेल्सियसवर पोहोचले आहे. पुढील ४८ तासात दोन ते तीन डिग्री पारा आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने थंडी वाढणार आहे.
हवामान विभागानुसार वातावरणात बदल होत आहे. शेजारी राज्य मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्येही पारा खाली घसरत आहे. विदर्भातील जिल्ह्यामध्येही गेल्या दोन दिवसात पारा खाली घसरल्याची नोंद झाली आहे. नागपुरात सकाळचे तापमान १.३ डिग्री वाढून २९ डिग्री सेल्सियसवर पोहोचले आहे. तर रात्रीचे तापमान गेल्या २४ तासात १.२ डिग्रीने खाली घसरले आहे. परंतु सरासरीपेक्षा ४ डिग्री सेल्सियसने अधिक असल्यामुळे अजूनही कडाक्याच्या थंडीला सुरुवात झालेली नाही.