शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मेडिकलमध्ये संशोधन : प्लाझ्मा थेरपीने गाठला पहिला टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 21:52 IST

कोविडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यास रुग्णाचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढते. म्हणून कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, त्या व्यक्तीचा रक्तातील प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिला जातो. याला ‘प्लाझ्मा थेरपी’ म्हटले जाते. मेडिकलमध्ये यावर संशोधन सुरू आहे. शनिवारी संशोधनातील पहिला टप्पा ओलांडला.

ठळक मुद्देकोविड बरा झालेल्या रुग्णाने दिला प्लाझ्मा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यास रुग्णाचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढते. म्हणून कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, त्या व्यक्तीचा रक्तातील प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिला जातो. याला ‘प्लाझ्मा थेरपी’ म्हटले जाते. मेडिकलमध्ये यावर संशोधन सुरू आहे. शनिवारी संशोधनातील पहिला टप्पा ओलांडला. कोविड बरा झालेल्या एका रुग्णाने आपले प्लाझ्मा दान केले. आता लवकरच मध्यम गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाला ते उपलब्ध करून दिले जाईल. ‘कोविड-१९’चा रुग्णाच्या उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन आशा निर्माण केली आहे. या थेरपीवर संशोधन करण्यासाठी देशातील नागपूरच्या मेडिकलसह १११ वैद्यकीय महाविद्यालयांनी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’कडे (आयसीएमआर) परवानगी मागितली होती. यात २१ महाविद्यालयांना मंजुरी मिळाली. यात महाराष्ट्रातील केवळ पाच महाविद्यालये असून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) समावेश आहे. कोविडचा बरा झालेला रुग्ण कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या रुग्णाला बरेकरू शकतो, हे समोर आले. परंतु प्लाझ्मा थेरपी किती यशस्वी ठरू शकते, याबद्दल अजून ठोस पुरावे नाहीत. मेडिकलमध्येही प्लाझ्मा थेरपीवर संशोधन सुरू आहे. ‘प्लाझ्मा थेरपी ट्रायल’ प्रकल्पाचे प्रिन्सीपल इन्व्हेस्टीगेटर श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम आहेत तर को-इन्व्हेस्टीगेटर म्हणून मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी व रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते आहेत. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन होत आहे. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गोसावी म्हणाले, शनिवारी पहिल्यांदा कोविड पॉझिटिव्ह असलेला व बरे होऊन २८ दिवस झालेला, परंतु कोणतेही लक्षणे नसलेल्या कोरोनामुक्त रुग्णाने रक्तदान केले. एका खासगी रक्तपेढीत त्याने हे रक्तदान केले. त्यांच्या रक्तातून प्लाझ्मा वेगळा केला जाईल आणि नंतर मध्यम गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाला तो दिला जाईल. सध्यातरी मेडिकलमध्ये असे लक्षणे असलेला रुग्ण नाही. यामुळे प्रतीक्षा करावी लागणार आहे.दोन गटांवर होईल संशोधनआयसीएमआर’ मार्गदर्शक तत्त्वानुसार देशात २२६ मध्यम गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा एक गट राहील. त्यांच्यावर जनरल औषधांचा उपचार केला जाईल, तर दुसऱ्या २२६ मध्यम गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांच्या गटाला ‘प्लाझ्मा थेरपी’ देऊन दोघांचा अभ्यास केला जाणार आहे. मेडिकलमध्ये सहा-सहा रुग्णांचे दोन गट तयार केले जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय