शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘मेयो’चे निवासी डॉक्टर आजपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ ...

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या मुख्य मागणीसाठी बुधवारपासून सामूहिक रजा आंदोलनाचे हत्यार उपसले. तसे निवेदन त्यांनी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना दिले. संपाच्या काळात अतिगंभीर रुग्ण अडचणीत येऊ नये म्हणून केवळ अतिदक्षता (आयसीयू) विभागात निवासी डॉक्टर सेवा देणार आहेत.

मेयो ‘मार्ड’चे सल्लागार सदस्य डॉ. गणेश पारवे यांनी सांगितले की, कोरोनाचे सामान्य रुग्ण सांभाळण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. यासाठी मागील वर्षी जवळपास ७५ वैद्यकीय अधिकारी (एमओ) मेयोला दिले होते. जेव्हा रुग्णसंख्या कमी होऊ लागली तेव्हा त्यांनी ‘एमओ’ काढून घेतले. मेयो, मेडिकल हे ‘टर्शरी केअर सेंटर’ आहे. यामुळे कोरोनाचे केवळ गंभीर रुग्ण पाहण्याची जबाबदारी आमची आहे. मागील आणि आता हे सुद्धा वर्ष कोरोना रुग्णसेवेत जात आहे. २४ तास ड्युटी लावली जात आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. ‘स्पेशालिस्ट’ डॉक्टर होण्यासाठी लागणारे शिक्षण, कौशल्य व अनुभव कधी मिळणार, हा प्रश्न आहे. मागील वर्षी शिक्षण झालेच नाही, तरीही शिक्षणाची फी भरण्यास लावली जात आहे. ती माफ व्हायला हवी. २४ तास बाधितांच्या सेवेत राहूनही निकृष्ट दर्जाचे पीपीई किट पुरविले जातात. हे थांबायला हवे. कोरोना रुग्णांमुळे मेयोमध्ये शोधप्रबंध (थेसीस) करण्यास इतर रुग्ण मिळत नाही. यामुळे ‘थेसीस’मधून सूट देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आल्याचे डॉ. पारवे म्हणाले.

शिष्टमंडळात मेयो ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल, सरचिटणीस डॉ. आशिष केंद्रे, डॉ. आसिफ पटेल, डॉ. गणेश पारवे, डॉ. अद्वैत मुळे उपस्थित होते.

- रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता

निवासी डॉक्टर हे शासकीय रुग्णालयातील ‘कणा’ समजले जातात. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांना सेवा देण्यास हेच समोर आहेत. वरिष्ठ डॉक्टर कोविड वॉर्डात जातही नाहीत. यामुळे बुधवारपासून रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

- आंदोलन मागे घेण्यासाठी बोलणी सुरू

निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेचे आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू पाहता ते आंदोलन मागे घेतील, ही अपेक्षा आहे.

- डॉ. अजय केवलिया

अधिष्ठाता, मेयो