शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

वाहून गेलेल्या बसमध्ये नांदेडमधून बसले होते 8 जण, उमरखेडवरूनही काही प्रवासी बसल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 1:58 PM

एसटीच्या वाहनचालकाला होता 24 वर्षांचा अनुभव, नागपूर नांदेड मार्गावर 15 वर्षापासून देत होता सेवा...

नागपूर- नांदेडवरून नागपूरकडे येताना उमरखेड समोरील पुलावरून वाहून गेलेल्या बसमध्ये नांदेडवरून बसलेल्या आठ प्रवाशांची नोंद एसटी महामंडळाच्या जीपीएस प्रणाली वरून झाली आहे. या बसमध्ये उमरखेड वरून पुन्हा किती प्रवासी बसले याची मात्र नोंद नाही. यामुळे बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, यासंदर्भात अद्याप निश्चित माहिती नाही.

नागपूरचे विभाग नियंत्रक नरेंद्र बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस घाटरोड डेपोची असून वाहन चालक सतीश रंगप्पा सूरेवार (53) आणि  कंडक्टर भिमराव लक्ष्मण नागरीकर (56) हे सेवेत होते. काल रात्री 10 वाजता प्रवासी घेऊन हे दोघेही नांदेडला निघाले होते. यानंतर, मंगळवारी सकाळी 05:18 वाजता ही बस नांदेडवरून निघाली. तिकीट मशीनला जोडलेल्या जीपीएस प्रणाली नुसार या बसमध्ये आठ प्रवासी होते. त्यातील 4 हदगाव व 4 प्रवासी दिग्रसला उतरणारे होते. उमरखेडवरून ही बस 7.30 वाजता दिग्रसमार्गे नागपूरकडे निघाली. हे घटनास्थळ उमरखेड पासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असल्याने किती प्रवाशांचे बुकिंग झाले हे मात्र कळू शकलेले नाही.

Video : वाहत गेलेल्या बसचा व्हिडिओ व्हायरल, मदतीसाठी युवकांच्या लगेचच पाण्यात उड्या

एसटी चालकाला 24 वर्षाच्या सेवेचा अनुभव - एसटी चालक सतीश सूरेवार यांना एसटी महामंडळामध्ये 24 वर्षांच्या सेवेचा अनुभव आहे. 1997 मध्ये ते महामंडळात रुजू झाले होते. त्यांच्या हाताने एकही अपघात घडल्याची नोंद नाही. मागील 15 वर्षापासून नागपूर- नांदेड या मार्गावरील सेवेचा त्यांना अनुभव होता. काल रात्री याच मार्गावरून बस नेताना त्यांना नाल्याला फारसा पूर दिसला नसावा. यामुळे परत येताना ओव्हर कॉन्फिडन्समुळे त्यांनी ही बस पुलावरून टाकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

केबिनमध्ये तीन प्रवासी मृतावस्थेतएसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य केले. तीन जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर केबिनमध्ये पुन्हा 3 जण मृतावस्थेत दिसत असल्याची माहिती आहे. बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 

टॅग्स :floodपूरpassengerप्रवासीBus Driverबसचालकdrowningपाण्यात बुडणेYavatmalयवतमाळnagpurनागपूरNandedनांदेड