आॅटोची स्टंटबाजी करण्यास रोखले म्हणून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 14:42 IST2017-10-28T14:37:52+5:302017-10-28T14:42:07+5:30

Mauling as opposed to auto stunting | आॅटोची स्टंटबाजी करण्यास रोखले म्हणून विनयभंग

आॅटोची स्टंटबाजी करण्यास रोखले म्हणून विनयभंग

ठळक मुद्देमहिलेशी लज्जास्पद वर्तनपरिवारातील सदस्यांना शिवीगाळ

आॅनलाईन लोकमत
नागपूर : घरासमोर वेगात आडवातिडवा आॅटो चालविण्यास मनाई केली म्हणून दोघांनी एका महिलेसोबत लज्जास्पद वर्तन केले. तिच्या नातेवाईकांनीही अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.
शुक्र वारी सायंकाळी ५ च्या सुमारास मानकापूर परिसरात ही घटना घडली. फिर्यादी महिला तिच्या घराच्या अंगणात उभी होती. बाजूला राहणाारा आरोपी प्रमोद उर्फ छोटू चंद्रिकाप्रसाद मिश्रा आणि हिमांशू सुभाष पांडे हे दोघे वेगात आणि आडवातिडवा आॅटो चालवित होते. या स्टंटबाजीला महिलेने आक्षेप घेतला. त्यामुळे आरोपी मिश्रा आणि पांडेसोबत तिची बाचाबाची झाली. त्यानंतर पीडित महिलेने मानकापूर ठाण्यात  तक्रार  नोंदवून आरोपी मिश्रा आणि पांडेने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून आपल्या नातेवाईकांना मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला.  पोलिसांनी विनयभंग आणि धमकी दिल्याच्या आरोपावरून आरोपी मिश्रा आणि पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 तक्रारदार महिला आणि आरोपी मिश्रा तसेच पांडे यांच्यात अनेक दिवसांपासून वाद आहे. त्यांच्यात कुरुबुरी सुरू असतात यापूर्वीही त्यांच्यात वाद झाला असून, पोलिसांत तक्रारही झालेली आहे.

Web Title: Mauling as opposed to auto stunting