पानठेल्यात सापडला मटका अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:39+5:302021-02-05T04:56:39+5:30
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ ने गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील अनंतनगर परिसरातील चर्चित संतोष उपाध्याय याला साथीदारासह ...

पानठेल्यात सापडला मटका अड्डा
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ ने गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील अनंतनगर परिसरातील चर्चित संतोष उपाध्याय याला साथीदारासह सट्ट्याची खायवडी करताना रंगेहाथ पकडले. निरंजन शक्तीरंजन घोड (२४, रा. गोरेवाडा) असे संतोषच्या साथीदाराचे नाव आहे. संतोषचे कुटुंबीय पोलिसांशी जुळलेले आहेत. तो अनेक दिवसांपासून सट्टा व जुगार अड्डा चालवत होता. अनंतनगर चौकात त्याचा पानठेला आहे. येथूनच तो सट्ट्याची खायवडी करीत होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ ला याची माहिती होताच त्यांनी बुधवारी संतोषच्या पानठेल्यावर धाड टाकली. झडती घेतली असता खायवडीची पावती सापडली. पोलिसांनी रोख रकम, मोबाइल व खायवडीच्या पावत्यांसह ३० हजारांचा माल जप्त केला. संतोष व त्याच्या साथीदाराविरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष अनेक महिन्यांनंतर पोलिसांच्या हाती लागला. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय किशोर पार्वते, एपीआय सुमित परतेकी, पीएसआय मोहेकर, लक्ष्मी छाया तांबुस्कर, एएसआय सीतानाथ पांडे, मोहन साहू, सतीश पांडे, महेश कुरसंगे, सूरज भनावत, राजेश तिवारी, सुनील कुंवर, श्याम गोरले, मंगल चव्हाण तथा निनाजी तायडे यांनी केली.