काटोल रोडवर सापडला मटका अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 21:26 IST2020-09-09T21:24:37+5:302020-09-09T21:26:25+5:30

काटोल रोडवर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर झोन दोनच्या पथकाने धाड टाकून ११ आरोपीस अटक केली. पोलिसांना पाचपावली येथील ओमकार चिमूरकर हा काटोल रोडवरील शेवटच्या बस स्टॉपजवळ मटका अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी तिथे धाड टाकली.

Matka Adda found on Katol Road | काटोल रोडवर सापडला मटका अड्डा

काटोल रोडवर सापडला मटका अड्डा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल रोडवर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर झोन दोनच्या पथकाने धाड टाकून ११ आरोपीस अटक केली. पोलिसांना पाचपावली येथील ओमकार चिमूरकर हा काटोल रोडवरील शेवटच्या बस स्टॉपजवळ मटका अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी तिथे धाड टाकली. तेव्हा पोलिसांना तिथे ओमकार चिमूरकर याच्यासह लव सुखदेव मेश्राम, फहीम तुरात शेख, सुनील शेट्टी जाफनीकर, नरेश चुन्नुलाल मनवर, चंद्रमणी रंगनाथ पांडे, मोरेश्वर चिंतामण पोलकोंडवार, प्रकाश पन्नुजी भडके, पवन रवींद्र हेलोंडे, सलमान सुलतान खान आणि पिंकू तिवारी हे खायवडी करताना सापडले. त्यांच्याजवळून रोख रकमेसह ७८ हजाराचा माल जप्त करण्यात आल. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीसीपी विनिता साहू, निरीक्षक सुनील चव्हाण, पीएसअय राजेंद्र घुगे, साजीद अहमद, कर्मचारी रेमंड, मोनू सय्यद, युवराज ढोले, संतोष उपाध्याय, इमरान, संतोष आणि आशिष यांनी केली.

Web Title: Matka Adda found on Katol Road