शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

गणिताचा शिक्षक झाला सैतान, १२ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार

By योगेश पांडे | Updated: April 12, 2023 16:04 IST

शाळेच्या प्रयोगशाळेतच अनेकदा अत्याचार : जीवे मारण्याचीदेखील दिली धमकी

योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मनुष्याच्या आयुष्याला दिशा दाखविणारी व्यक्ती अशी शिक्षकाची ओळख असते. मात्र नागपुरातील एका गणिताच्या शिक्षकाने अवघ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीच्या आयुष्याला अक्षरश: कुस्करून टाकले आहे. संबंधित शिक्षकाने सुमारे पाच महिने सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केला. आश्चर्याची बाब म्हणजे शाळेच्या प्रयोगशाळेतच त्याने अनेकदा कुकृत्य केल्यावरदेखील शाळेतील कुणालाही यावर संशय आला नाही. सैतान झालेल्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून यामुळे शाळेत तसेच शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजय विठ्ठल पांडे (५७, कामगारनगर, जट्टेवार सभागृहाजवळ) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो एका शाळेत गणिताचा शिक्षक असून सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १२ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत सहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. आरोपी संजयची तिच्यावर सुरुवातीपासूनच वाईट नजर होती. त्याने तिला विश्वासात घेऊन प्रेम असल्याचे सांगितले व तिच्याशी लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली. कोवळ्या वयातील विद्यार्थिनीला त्याच्या मागील मनसुबे कळालेच नाही व ती त्याच्या जाळ्यात फसली. संजयने तिच्यावर शाळेतच अनेकदा अत्याचार केले. १० डिसेंबर २०२२ ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत हा प्रकार सुरू होता.

दरम्यानच्या काळात मुलीला पोटदुखीचा त्रासदेखील झाला. तिला आईने विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली होती. ५ एप्रिल रोजी आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने शिक्षक संजय पांडेच्या काळ्या कारनाम्यांची माहिती दिली. हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पेपर सुटल्यावरदेखील त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे मुलीच्या पोटात वेदना होत होत्या. मात्र तरीदेखील त्याने दया दाखविली नाही. याशिवाय जर कुणालाही हा प्रकार सांगितला तर जीवे मारण्याचीदेखील त्याने धमकी दिली होती. आईने अखेर हिंमत दाखविली व सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.

प्रयोगशाळेतच कुकृत्य

आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीवर अनेकदा जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले. बहुतांश वेळा तो तिला शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेतच घेऊन जात असे. गणिताचा शिक्षक विज्ञान प्रयोगशाळेत वारंवार जात असल्याचे शाळेत कुणाच्याही निदर्शनास कसे आले नाही व संशय कसा आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संजय पांडे लवकरच निवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीच्या वयात वासनांध झालेल्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी