एमआयडीसीतील नित्यानंद प्लास्टिक कंपनीला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:37 IST2020-12-17T23:33:41+5:302020-12-17T23:37:36+5:30
Fire MIDC, nagpur news हिंगणा एमआयडीसीतील नित्यानंद उद्योग कंपनीला गुरुवारी रात्री ७.३० वाजता भीषण आग लागली.

एमआयडीसीतील नित्यानंद प्लास्टिक कंपनीला भीषण आग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (हिंगणा ) : हिंगणा एमआयडीसीतील नित्यानंद उद्योग कंपनीला गुरुवारी रात्री ७.३० वाजता भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. ही कंपनी एसटी वर्कशॉप नजीक आहे. या कंपनीमध्ये प्लास्टिक प्रोसेसींग जॉब बनविले जातात. ही कंपनी ऑर्डनस फॅक्टरीसाठी वेंडर म्हणून काम करते. आग आटोक्यात आणण्यासाठी एमआयडीसी, नागपूर महानगरपालिका व ऑर्डनन्स फॅक्टरी येथून अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे कार्य सुरु होते. शॉर्टसर्कीटमुळे आग लागली असावी असा अंदाज घटनास्थळी दाखल असलेले पोलीस अधिकारी पुरुषोत्तम राऊत यांनी व्यक्त केला.