नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

By जितेंद्र ढवळे | Updated: June 13, 2024 16:37 IST2024-06-13T16:35:57+5:302024-06-13T16:37:25+5:30

नागपूर जिल्ह्यातील धामणा गावाजवळ असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव प्रा. ली. कंपनीत आज दुपारी भीषण स्फोट झाला.

massive explosion at explosives factory in nagpur district five dead including four women and four seriously injured | नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

जितेंद्र ढवळे,नागपूर : जिल्ह्यातील धामणा गावाजवळ असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव प्रा. ली. कंपनीत आज दुपारी भीषण स्फोट झाला. यामुळे चार महिलांसह सहा जणाचा जागीच मृत्यू झाला. तर चार गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत आणि शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर अमरावती महामार्गावर नागपूर पासून २५ किलोमीटर अंतरावर धामणा हे गाव असून येथे बारूद तसेच फटाक्याच्या वाती निर्माण केल्या जातात. कंपनीत नेहमीप्रमाणे आज सकाळपासून बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला आणि त्यात आत मधील सर्वजण गंभीर जखमी झाले.  मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या गावातील हजाराच्या संख्येत नागरिक या स्फोटाच्या कारखान्याकडे धावले. त्यांनी जखमींची मदत करण्याचे प्रयत्न केले ॲम्बुलन्स घटनास्थळी बोलवून सर्व जणांना नागपूरला रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल त्यांच्यासह  अनिल देशमुख हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा ताफा आणि स्फोटक विशेषज्ञ पोहोचले. त्यांनी  घटनास्थळी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

वृत्त लिहिताना घटनास्थळी शोक संतप्त नागरिकांची प्रचंड गर्दी होती आणि वातावरण तणावपूर्ण होते.

Web Title: massive explosion at explosives factory in nagpur district five dead including four women and four seriously injured