शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

Nagpur Crime: 'माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जिवंत मारीन' ; एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 19:44 IST

Nagpur Crime: हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर, तर तिला वाचविण्यासाठी सरसावलेला विद्यार्थी किरकोळ जखमी झाला असून, आरोपी सावनेरच्या दिशेने पळून गेला.

सावरगाव : कॉलेजमध्ये जात असलेल्या विद्यार्थिनीवर धावत्या बसमध्ये प्राणघातक हल्ला चढवीत चाकूने वार केल्याची घटना नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव येथे गुरुवारी (दि. ९) सकाळी नऊच्या सुमारास घडली. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर, तर तिला वाचविण्यासाठी सरसावलेला विद्यार्थी किरकोळ जखमी झाला असून, आरोपी सावनेरच्या दिशेने पळून गेला. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली.

नितीन सोपीनाथ तागडे (रा. जुनोना (फुके), ता. नरखेड) असे फरार आरोपीचे नाव आहे. जखमी विद्यार्थिनी सिंदी (उमरी, ता. नरखेड) येथील रहिवासी असून, ती काटोल शहरातील नबिरा महाविद्यालयात बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षाला शिकते. ती रोज मध्य प्रवेश परिवहनच्या बसने कॉलेजमध्ये जाते. तिच्या कॉलेजमध्ये जाण्याची वेळ आरोपी नितीनला माहिती आहे. ती गुरुवारी सकाळी एमपी-२८/पी-१०९९ क्रमांकाच्या बसने कॉलेजमध्ये जायला निघाली. बसमध्ये प्रवाशांसोबत इतर विद्यार्थीदेखील होते. नितीन मध्येच बसमध्ये चढला.

त्याने बसमध्ये 'माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला जिवंत मारीन' अशी धमकी देत तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. काहीएकतर्फी प्रेम व लग्नासाठी दबाव नितीन त्या विद्यार्थिनीवर एकतफीं प्रेम करतो. तो मागील तीन वर्षांपासून तिचा सतत पाठलाग करायचा व लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकायचा. तो बुधवारी (दि. ८) रात्री सिंदी (उमरी) येथे तिच्या घरी गेला होता. 'तुम्ही माझे तिच्याशी लग्न लावून दिले नाही तर तुमच्या मुलीला जिवंत मारीन' अशी धमकीही त्याने तिच्या आईवडिलांना दिली होती. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांनी केली आहे.

कळायच्या आत त्याने चाकूने तिच्या छातीवर एक वार केला. ती ओरडताच बसमध्ये असलेला यश काळबांडे (१९, रा. सावरगाव, ता. नरखेड) हा विद्यार्थी तिच्या मदतीला धावला. त्याने नितीनच्या हाती असलेला चाकू पकडून दुसरा वार वाचविला. या धावपळीत त्याच्या हातालाही दुखापत झाली. ती जखमी होताच बस थांबविण्यात आली. सावरगाव येथील नागरिक गोळा होण्यापूर्वीच नितीनचे बसमधून उडी मारून पळ काढला. तिच्यासह यशवर सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध घेणे सुरू केले आहे. वृत्त लिहिस्तो त्याला अटक करण्यात आली नव्हती. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Marry me or die': Stalker attacks student with knife.

Web Summary : In Savargaon, a student was stabbed on a bus by a stalker demanding marriage. A fellow student was injured trying to intervene. The attacker, Nitin Tagade, is absconding. He threatened the girl's parents earlier. Police are investigating.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी