शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

मराठवाडा, खान्देशात हेलिकॉप्टरने बीजारोपण

By admin | Published: May 22, 2017 5:04 PM

राज्यात रोपवनाची घसरलेली टक्केवारी वाढविण्यासाठी मराठवाडा, खान्देशसह विदर्भातील भीषण दुष्काळ, उजाड रानमाळ असलेल्या भागात हेलिकॉप्टरने बीजारोपण केले जाणार आहे.

गणेश वासनिक । अमरावती : राज्यात रोपवनाची घसरलेली टक्केवारी वाढविण्यासाठी मराठवाडा, खान्देशसह विदर्भातील भीषण दुष्काळ, उजाड रानमाळ असलेल्या भागात हेलिकॉप्टरने बीजारोपण केले जाणार आहे. त्याकरिता वनमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून पावसाळ्यापूर्वीच हे बीजारोपण केले जाईल.राज्य शासनाने १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत होणाऱ्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यातील काही भागांत हेलिकॉप्टरने बीजारोपण करण्याची तयारी चालविली आहे. राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: हेलिकॉप्टरमध्ये बसून दुष्काळ, उजाड रानमाळातील डोंगर आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये आकाशातून बीजारोपण करणार आहेत.बीजारोपण करण्यापूर्वी कोणत्या भागात ते करावयाचे आहे, तो संपूर्ण परिसर सॅटेलाईट, नकाशाद्वारे हेलिकॉप्टरशी जोडला जाईल. चार आसनी हेलिकॉप्टरमध्ये वनमंत्री मुनगंटीवार, वनसचिव विकास खारगे आदी विराजमान असतील, अशी माहिती आहे. जंगलक्षेत्र नसलेल्या भागातच बीजारोपण केले जाणार आहे. त्याकरिता मराठवाडा, खान्देश, विदर्भातील दुष्काळी भागाचे नकाशे तयार करण्याची जबाबदारी वनविभागाकडे सोपविण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वीच हेलिकॉप्टरने बिजारोपण केले जाणार असल्याने जून महिन्याच्या ८ ते १० तारखेदरम्यान हा उपक्रम राबविला जाईल, अशी विश्वसनीय माहिती आहे. ज्या हेलिकॉप्टरमधून बीजारोपण होईल, ते सॅटेलाईटशी जोडले जाणार असून अद्ययावत नकाशेदेखील यात राहतील.