शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
4
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
5
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
6
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
7
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
8
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
9
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
10
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
11
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
12
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
14
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
15
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
16
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
17
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
18
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
19
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
20
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंद मुलीवर बलात्कार आरोपीस १० वर्षे कारावास

By admin | Updated: August 13, 2015 03:38 IST

उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मतिमंद मुलीवर दोनवेळा बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास

नागपूर : उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मतिमंद मुलीवर दोनवेळा बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील ८ हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. रंगराव ऊर्फ रंग्या देवराव रोहणकर (२५) असे आरोपीचे नाव असून, तो उमरेड तालुक्यातील हेवती येथील रहिवासी आहे. तो ट्रॅक्टरचालक आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, १ मार्च २०१३ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गावाशेजारीच पीडित मुलगी शौचास गेली होती. रंग्या हा तिच्या मागे गेला होता. त्याने जबरदस्तीने तिचे हात पकडून झुडपी जंगलात नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला होता. ही बाब पीडित मुलीने दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या आई-वडिलांना सांगितली होती. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रंग्याला आपल्या घरी बोलावले असता त्याने हातपाय जोडून यापुढे असे करणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली नव्हती. १० मार्च २०१३ रोजी रात्रीच्या वेळी पीडित मुलगी शौचास गेली असता रंग्याने तिला गाठले होते. तिला जबरदस्तीने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. रात्रीचे ९ वाजूनही मुलगी घरी नसल्याचे पाहून आई-वडिलांनी तिचा शोध घेतला. बऱ्याच वेळानंतर ती घराकडे येताना दिसली होती. वडिलांनी विचारल्यावर तिने पुन्हा रंग्याने बलात्कार केल्याचे सांगितले होते. रंग्या हा वारंवार आपल्या मुलीसोबत हे अश्लील कृत्य करीत राहील म्हणून १४ मार्च रोजी आई-वडिलांनी उमरेड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी भादंविच्या ३७६ (२) (के), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या कलम ४, ८ अन्वये गुन्हा दाखल करून १५ मार्च २०१३ रोजी रंग्याला अटक करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक आर. के. राऊत यांनी पोलीस निरीक्षक सुरेश भोयर यांच्या मार्गदर्शनात तपास करून रंग्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात ८ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी यांनी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अडवाणी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)