शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मराठा बंद, दोन हजार जवान तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:36 IST

मराठा समाजातर्फे गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सुरक्षेचा तगडा बंदोबस्त केला आहे. शहरात अधिकाऱ्यांसह २ हजार जवानांना रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी १०० स्ट्रायकिंग फोर्स आणि क्वीक रिस्पॉन्स टीमसुद्धा तैनात ठेवण्यात आली आहे. बंददरम्यान कुठली परिस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने शहरात सर्वत्र सुरक्षेचे जाळे पसरविलेले आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा तगडा बंदोबस्तकुठल्याही स्थितीचा सामना करण्यास जवान तैनात१०० स्ट्रायकिंग फोर्सशहरभरात सुरक्षेचे जाळे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा समाजातर्फे गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सुरक्षेचा तगडा बंदोबस्त केला आहे. शहरात अधिकाऱ्यांसह २ हजार जवानांना रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी १०० स्ट्रायकिंग फोर्स आणि क्वीक रिस्पॉन्स टीमसुद्धा तैनात ठेवण्यात आली आहे. बंददरम्यान कुठली परिस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने शहरात सर्वत्र सुरक्षेचे जाळे पसरविलेले आहे.मराठाआंदोलनादरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी बंदला मराठा समाजाने प्रतिष्ठेचा मुद्दा बनविलेला आहे. मुख्यमंत्री हे नागपूरचे असल्याने पोलिसांसाठी ही परीक्षेची वेळ आहे. पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम हे रुजू झाल्यापासून त्यांचा नागपुरातील हा पहिलाच बंदोबस्त असेल. पोलीस आयुक्त दोन दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरात मॉक ड्रीलही करण्यात आली.पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २५० अधिकारी आणि १७५० पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. यात १५०० पुरुष आणि २५० महिला कर्मचारी आहेत. शहरातील प्रत्येक भागात पोलीस तैनात राहतील. संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण भागातील सुरक्षिततेत अतिरिक्त सावधगिरी बाळगली जाईल. कोतवाली, गणेशपेठ, सक्करदरा, नंदनवन, हुडकेश्वर, सोनेगाव, प्रतापनगर आदी पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाल्यास त्याला नियंत्रणात आणण्यासाठी १०० स्ट्रायकिंग फोर्स बनवण्यात आली आहे. ते शहरात फिरत गस्त लावतील. उपायुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच विशेष पथके तयार राहतील. काही पथके नियंत्रण कक्षात रिझर्व्ह ठेवण्यात येईल. सर्व अधिकाऱ्यांना सकाळपासूनच आपल्या परिसरात गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुठलीही अप्रिय घटनेची शक्यता दिसताच तात्काळ वरिष्ठांना सूचित करण्यास सांगितले आहे.वाहतूक पोलिसांचीही वेगळी व्यवस्था केली आहे. महत्त्वपूर्ण चौकांसह रस्त्यांवरही पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. वाहतूक पोलीस अधिकारीही शहरात गस्त घालतील. असे सांगितले जाते की, मराठा समाजातील प्रमुख नागरिक गुरुवारी सकाळी महाल गांधी गेट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाची सुरुवात करतील. यानंतर रॅली किंवा समूहाद्वारे शहरात फिरण्याची शक्यता आहे. पोलिसांना असा संशय आहे की, आंदोलनकर्ते प्रमुख बाजारांना बंद करण्यासह वाहतूक व्यवस्थेलाही हानी पोहचवू शकतात. रस्त्यांवर आंदोलन करून वाहतूक प्रभावित करू शकतात. वाहनांचे टायर जाळणे किंवा लहानसहान दगडफेक करून तणाव निर्माण केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यूहरचना आखली आहे. बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.गोंधळ घालणाऱ्यांवर नजरपोलीस बंददरम्यान गोंधळ घालणाऱ्यांवर बारीक नजर ठेवून राहतील. ते काही लोकांवर लक्ष ठेवूनही आहेत. काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके काही दिवसांपासून आंदोलनादरम्यान खूप सक्रिय होते. ते निवडणूक प्रचारासाठी मध्य प्रदेशात असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :marathaमराठाagitationआंदोलन