शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

Corona Virus in Nagpur; उपराजधानीत अनेक बेघर व मनोरुग्ण प्रतिक्षेत; निवारे पडताहेत अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:32 AM

नागपूर महानगरपालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने बेघरांसाठी आणि भिकारी व मनोरुग्णांसाठी तात्पुरते निवारे उभारले असले तरी अनेक बेघर आणि मनोरुग्ण आजही रस्त्यावरच असल्याचे चित्र शहरात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने बेघरांसाठी आणि भिकारी व मनोरुग्णांसाठी तात्पुरते निवारे उभारले असले तरी अनेक बेघर आणि मनोरुग्ण आजही रस्त्यावरच असल्याचे चित्र शहरात आहे. अनेकांपर्यंत या निवाऱ्यांची माहिती पोहचत नसल्याने आणि आपल्या गावाकडे जाण्याच्या प्रयत्नात असल्याने अनेकजण रस्त्यावरच वाहनांची प्रतीक्षा करत असल्याची माहिती आहे.नागपूर महानगरपालिकेने नागरी उपजीविका अभियान आणि दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून आजघडीला १५ बेघर निवारा केंदे्र उभारली आहेत. त्यांची क्षमता १ हजार २६२ अशी आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून परप्रांतीय कामगार, बेघरांना येथे पाठविले जात असले तरी अनेक बेघर आणि परप्रांतीय कामगार रस्त्यावरच आहेत. मंदिरांसमोर मनोरुग्ण आणि भिकाऱ्यांची गर्दी असते. रात्रीही ते त्याच परिसरात मुक्कामाला असतात. बहुतेक भिकारी आता अशा ठिकाणाहून हटले असले तरी वर्धा रोडवरील साईबाबा मंदिरासमोर मनोरुग्ण आणि भिकारी असे मिळून सात व्यक्ती आजही तिथेच वास्तव्याला आहेत. समाजसेवी संस्थांचे कार्यकर्ते त्यांना अन्न देत आहेत.अशीच स्थिती अन्य मंदिरांसमोरही कमी अधिक प्रमाणात आहे. मंदिरे बंद झाली असली तरी परिसरातील नागरिक आणि स्वयंसेवी संस्था अन्न पुरवत असल्याने त्यांची गरज सध्यातरी भागत आहे.परप्रांतीय कामगार आपल्या गावाकडे निघाले असले अद्यापही अनेक कामगार अडकून आहेत. प्रवासासाठी एखादे साधन मिळेल या प्रतीक्षेत ही मंडळी असल्याने शहराबाहेर त्यांचे जत्थ्ये दिसत आहेत. मध्य प्रदेशातील जौनपूर येथील २० मजूर हुडकेश्वरमधील राजापेठ बसस्थानकाजवळ सोमवारी सकाळी अडकून पडले होते. त्याच्या जेवणाचे हाल सुरू असल्याने त्यांनी मदतीसाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे. गावाकडे जाण्यासाठी काहीतरी साधन मिळेल, या आशेने ते या ठिकाणी थांबले होते, अशी माहिती आहे.बुटी कन्या शाळेचा निवारा नावापुरतामहानगरपालिकेने सीताबर्डी येथील सुपर मार्केटमागे असलेल्या बुटी कन्या शाळेत शहरी बेघर निवारा उभारला असून येथे २८ व्यक्तींच्या निवाºयाची व्यवस्था असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात हा निवारा नावापुरताच आहे. या शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे. पिल्लरचेही काम सुरू असल्याने निवासासारखी सुविधा येथे शक्य नाही. तरीही महानगरपालिकेने येथे काही गाद्या टाकून विश्रांतीची व्यवस्था केली आहे. मात्र येथे सोमवारी फक्त एकच व्यक्ती थांबलेला होता.निवारे अपुरेशहरात उभारलेले निवारे आता अपुरे पडत आहेत. या निवाऱ्यांची क्षमता १ हजार २६२ असली तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे अनेक निवाºयांमध्ये बेडमधील अंतर वाढविले आहे. गणेशमंदिर टेकडी रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली असलेल्या गाळ्यांमध्ये ३० जणांच्या निवाऱ्यांची क्षमता असली तरी येथे बेडमध्ये अंतर राखण्यात आल्याने जेमतेम १५ ते १६ व्यक्तींच्याच निवाºयाची व्यवस्था झाली आहे. यामुळे निवारे अपुरे पडत असल्याने ते वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस