शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडे मनुष्यबळ व यंत्रांची कमतरता

By admin | Updated: April 7, 2016 03:07 IST

महानगरपालिकेने बुधवारी बाजारांच्या दुरवस्थेच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : बाजारांच्या दुरवस्थेचे प्रकरणनागपूर : महानगरपालिकेने बुधवारी बाजारांच्या दुरवस्थेच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांच्याकडे मनुष्यबळ व यंत्रांची कमतरता असल्याची माहिती दिली. तसेच, अशाही परिस्थितीत शहरात साफसफाई ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.‘लोकमत’ने शहरातील अनधिकृत बाजार, बाजारातील अस्वच्छता, अत्याधुनिक बाजार उभारण्याची गरज, अतिक्रमण इत्यादीसंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. न्यायालयाच्या निर्देशावरून मनपाने यावर उत्तर सादर केले आहे. मनपाकडे संपूर्ण शहरासाठी केवळ एकच अतिक्रमणविरोधी पथक आहे. हे पथक पोलिसांचे संरक्षण मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन अतिक्रमण हटविण्याचे काम करते. मनपा एका खासगी कंपनीमार्फत हॉकर्सची नोंदणी करीत आहे. आतापर्यंत ३५ हजार २४६ हॉकर्सची नोंदणी झाली आहे. हॉकर्स झोन तयार करण्यासाठी २९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती हा विषय हाताळीत आहे. शहरातील कचरा उचलण्याचे काम कनक रिसोर्सेस कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी रोज ८ ते १० टन कचरा गोळ करून भांडेवाडीत साठवते. या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मंगळवारीत आधुनिक मासळी बाजार उभारण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचा त्रास संपलाय अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)