आंबेडकर महाविद्यालयाला मनोहरभाईंची अशीही मदत, सरन्यायाधीश भूषण गवईंनी दिला आठवणींना उजाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:29 IST2025-08-04T10:29:02+5:302025-08-04T10:29:26+5:30

दीक्षाभूमी स्मारक समिती संचलित डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा शनिवारी सरन्यायाधीश भूषण गवई तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, डाॅ. कमलताई गवई आदींच्या उपस्थितीत पार पडला. 

Manoharbhai's help to Ambedkar College was also like this, Chief Justice Bhushan Gavai reminisced | आंबेडकर महाविद्यालयाला मनोहरभाईंची अशीही मदत, सरन्यायाधीश भूषण गवईंनी दिला आठवणींना उजाळा 

आंबेडकर महाविद्यालयाला मनोहरभाईंची अशीही मदत, सरन्यायाधीश भूषण गवईंनी दिला आठवणींना उजाळा 

नागपूर : दीक्षाभूमी परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व जडणघडणीत स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह इतरांचेही याेगदान राहिले आहे. एकेकाळी महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांना  वेतन द्यायला पैसा नव्हते. अशावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे वडील, गोंदियाचे उद्योजक मनोहरभाई  पटेल यांनी मदतीचा हात पुढे केला, अशी आठवण सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितली. 

दीक्षाभूमी स्मारक समिती संचलित डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा शनिवारी सरन्यायाधीश भूषण गवई तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, डाॅ. कमलताई गवई आदींच्या उपस्थितीत पार पडला. 

जिव्हाळ्यातून अट टाकली
सरन्यायाधीश गवई म्हणाले, दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय कठीण परिस्थितीतून आंबेडकर महाविद्यालयाची उभारणी केली. सुरुवातीला चार खोल्यांच्या चाळीत महाविद्यालय चालायचे. एकदा तर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नव्हते.

तेव्हा दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे आदींनी उद्योजक मनोहरभाई पटेल यांच्याकडे अडचण सांगितली. पटेल यांना संस्था व पदाधिकाऱ्यांबद्दल आत्मीयता होती. त्यांनी जिव्हाळ्यातून अट टाकली की, आपण दोघे गोंदियाला येऊन माझ्याकडे जेवण केले तर मदत करू. दोघेही त्यानुसार गोंदियाला गेले व महाविद्यालयाला मदत मिळाली. अशा कठीण परिस्थितीतून महाविद्यालयाला वैभव प्राप्त झाले आहे.  

Web Title: Manoharbhai's help to Ambedkar College was also like this, Chief Justice Bhushan Gavai reminisced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर