नागपूर HSC 2018; दृष्टिदोषाला हरविणारी ‘मनिषा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:57 AM2018-05-31T10:57:14+5:302018-05-31T10:57:34+5:30

साधारण शेतमजुरी करणाऱ्या आईवडिलांची ती मुलगी. त्यातही जन्माने आलेला दृष्टिदोष तिची परीक्षा घेणारा. मात्र विपरीत परिस्थितीने मोडेल ती ‘मनिषा’ कसली?

Manisha who defeats blindness | नागपूर HSC 2018; दृष्टिदोषाला हरविणारी ‘मनिषा’

नागपूर HSC 2018; दृष्टिदोषाला हरविणारी ‘मनिषा’

Next
ठळक मुद्दे८१ टक्के गुणांचे नेत्रदीपक यशसंगीत शिक्षिका होण्याचा दृढनिश्चय

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारण शेतमजुरी करणाऱ्या आईवडिलांची ती मुलगी. त्यातही जन्माने आलेला दृष्टिदोष तिची परीक्षा घेणारा. एका डोळ्याचा २५ टक्के प्रकाश तिला आधार होता, पण सायंकाळ झाली की, तीही साथ सुटायची. मात्र विपरीत परिस्थितीने मोडेल ती ‘मनिषा’ कसली? त्याऐवजी आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारून ध्येय गाठण्यासाठी झगडणारी ती होती. तिचे हे परिश्रम बारावीच्या परीक्षेतून फळाला आले आहे. मेहनतीवर विश्वास ठेवणारी ही मुलगी म्हणजे मनिषा चांदेकर. एलएडी महाविद्यालयात शिकणाºया मनिषाने दृष्टिदोषाला पराभूत करीत कला शाखेत ८१ टक्के गुणांसह नेत्रदीपक यश मिळविले आहे.
वर्धा जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर राजीव चांदेकर यांची मोठी मुलगी मनिषा. अभ्यासातील तिचे कौशल्या लक्षात घेउन वडिलांनी तिला नागपूरला पाठविले. तिनेही आईवडिलांचा विश्वास सार्थ करीत परिश्रमाची जोड दिली. शासकीय वसतिगृहात राहणाºया मनिषाच्या प्रामाणिक अभ्यासाला एलएडी कॉलेजच्या शिक्षकांनीही मोलाचे सहकार्य केले. या सर्वांचे सहकार्य मनिषाने मिळविलेल्या ८१ टक्के गुणात दिसून येत आहे. लोकमतशी बोलताना मनिषाने तिच्या अभ्यासाचा प्रवास उलगडला. दररोज सहा ते सात तास अभ्यास करायचा, असे मनाशी पक्के केले होते. बहुतेक अभ्यास ब्रेल लिपीतील पुस्तकांच्या मदतीने आणि अभ्यासाचे रेकार्डिंग ऐकूनच केल्याचे तिने सांगितले. कॉलेजमध्ये शिक्षकांचे क्लासेस सुटणार नाही याची काळजी घेतली. सायंकाळ झाली की डोळ्यात सारखी जळजळ व्हायची. त्यामुळे अभ्यास करणेही शक्य होत नव्हते. म्हणून रात्री अभ्यास करण्यापेक्षा सकाळी उठून नियमितपणे अभ्यास करण्याची सवय लावली. परीक्षेत लेखनिकाच्या मदतीने पेपर सोडविले. यश मिळेल हा विश्वास नक्कीच होता. आईबाबांचा विश्वास सार्थ ठरला याचे समाधान असल्याची भावना तिने व्यक्त केली.
मामा गाण गात असल्याने लहानपणापासूनच संगीताची आवड निर्माण झाली. खरे तर मनावर असलेले दृष्टिदोषाची निराशा दूर करण्यात संगीताचे सहकार्य मिळाले. त्यामुळे संगीत शिक्षिका म्हणून याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा मनिषाने व्यक्त केली.

Web Title: Manisha who defeats blindness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.