शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

मंदार कोलतेला अटक : फसवणूक प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:31 AM

बँक खात्यात रक्कम नसताना धनादेश देऊन अनेकांना फसविल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी आकृती अ‍ॅडव्हर्टायजिंग एजन्सीचा संचालक मंदार कोलते याला आज अटक केली. न्यायालयाने त्याची नंतर व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली.

ठळक मुद्देन्यायालयातून जामिनावर सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँक खात्यात रक्कम नसताना धनादेश देऊन अनेकांना फसविल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी आकृती अ‍ॅडव्हर्टायजिंग एजन्सीचा संचालक मंदार कोलते याला आज अटक केली. न्यायालयाने त्याची नंतर व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली.कोलतेची आकृती अ‍ॅड एजन्सी आहे. त्याने आपल्या एजन्सीच्या मार्फत अनेक वृत्तपत्रांना लाखोंच्या जाहिराती दिल्या. मात्र, या जाहिरातीची रक्कम संबंधित वृत्तपत्राला न देता कोलतेने ती स्वत:च हडपल्याचा आरोप आहे. त्याच्यावर असलेल्या थकीत रकमेच्या बदल्यात कोलतेने अनेकांना धनादेश दिले. मात्र, त्या खात्यात रक्कमच नसल्याने ते वटले नाही. कोलतेच्या या फसवेगिरीविरुद्ध अनेकांनी तक्रारी केल्या. काहींनी पोलीस ठाण्यात तर काहींनी थेट वरिष्ठांकडेही तक्रारी केल्या. त्यामुळे कोलतेच्या विरुद्ध दोन डझनपेक्षा जास्त वॉरंटही निघाले. मात्र, पोलिसांसोबत लपवाछपवी खेळण्यात सराईत असलेला कोलते काही सापडत नव्हता. गुरुवारी दुपारी तो दुचाकीने जात असल्याचे पाहून बजाजनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोलतेला न्यायालयाने १७ हजार, ५०० रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. कोलतेला फसवणूक प्रकरणात दुसऱ्यांदा अटक झालेली आहे. त्याला यापूर्वी धंतोली पोलिसांनीही अशाच प्रकारे अटक केली होती. 

 

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा