दारुच्या नशेत आईवरून शिविगाळ, मित्राचा दगडाने ठेचून खून

By दयानंद पाईकराव | Updated: June 22, 2023 14:08 IST2023-06-22T14:07:35+5:302023-06-22T14:08:19+5:30

खुनाचा गुन्हा दाखल : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

man killed a friend because of abusive words for his mother | दारुच्या नशेत आईवरून शिविगाळ, मित्राचा दगडाने ठेचून खून

दारुच्या नशेत आईवरून शिविगाळ, मित्राचा दगडाने ठेचून खून

नागपूर : दारुच्या नशेत आईवरून शिविगाळ केल्यामुळे त्याचा राग मनात धरून मित्रानेच आपल्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केलेल्या एमआयडीसी पोलिसांनी यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

सुनिल हरिनारायण पंचेश्वर (वय २४, रा. वॉर्ड नं. ४, भिमनगर वस्ती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २३ मे २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत कार्तिकनगर टेकडीवर राजीवनगरच्या मागे चंदन शिवपुजन शहा (२२) याचा दगडाने ठेचून मारलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. यात एमआयडीसी पोलिसांनी मृतच चंदनची वहिणी मुस्कान कुंदन शहा (वय २३) हिच्या बयाणावरून अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला होता. तपासात मृतक चंदन व आरोपी सुनिल हे चांगले मित्र होते असे निष्पन्न झाले.

चंदन हा मुळचा बिहारचा रहिवासी असून काही दिवसांपूर्वी तो नागपुरात आला. चंदन आणि सुनिल दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. घटनेच्या दिवशी दोघांचे भांडण झाले होते. यात चंदनने सुनिलला आईवरून शिविगाळ केली. याचा राग मनात धरून आरोपी सुनिलने चंदनच्या डोक्यावर दगड मारून त्यास ठार केले. साक्षीदारांचे बयाण आणि शवविच्छेदन अहवालावरून एमआयडीसी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन बोरखडे यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सुनिलला अटक केली आहे.

Web Title: man killed a friend because of abusive words for his mother