धक्कादायक! पत्नीसह दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 18:50 IST2022-01-18T18:27:50+5:302022-01-18T18:50:30+5:30
नागपुरातील जरीपटका भागात एकाने पत्नी व मुलांची निर्घुणपणे हत्या केल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक! पत्नीसह दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या
ठळक मुद्देएकच खळबळ
नागपूर : पत्नी आणि दोन मुलांची चाकूचे घाव घालून निर्घुणपणे हत्या केल्यानंतर एका आरोपीने स्वत:ही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दयानंद पार्कजवळ ही थरारक घटना घडली.
मदन अग्रवाल असे हत्या करून आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. त्याने पत्नी किरण अग्रवाल, मुलगा वृषभ अग्रवाल(वय १०) व मुलगी टिया अग्रवाल(वय ५) यांची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात...