माणूस देवही बनू शकतो आणि राक्षसही : मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 13:13 IST2019-11-19T13:12:53+5:302019-11-19T13:13:16+5:30
शिक्षणातूनच विकास, सुख आणि मुक्ती अपेक्षित आहे. प्रत्येकजण चांगला बनण्याचा विचार करतो. मात्र, माणसामध्ये अहंकार असतो.

माणूस देवही बनू शकतो आणि राक्षसही : मोहन भागवत
नागपूर : पशू, पक्षी कधी आत्महत्या करत नाहीत, कारण त्यांच्यासमोर कोणतेही ध्येय नसते. यामुळे त्यांना जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत जगावेच लागते. मात्र, माणसाचे तसे नाही. तो देवही बनू शकतो आणि राक्षसही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
शिक्षणातूनच विकास, सुख आणि मुक्ती अपेक्षित आहे. प्रत्येकजण चांगला बनण्याचा विचार करतो. मात्र, माणसामध्ये अहंकार असतो. माणूस प्रत्येक गोष्टीवर त्याचे वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतो. तो कोणालाही काही देऊ इच्छित नाही. जरी दिले तरी कमीत कमी कसे देता य़ेईल हे पाहतो. ही हुशारी केवळ त्याच्याकडेच असल्याचे भागवत म्हणाले.
पुढे भागवत म्हणाले की, आपापसात भांडून दोघांचेच नुकसान आहे हे माणसाला माहिती असते, तरीही ते वाद सोडत नाहीत. स्वार्थीपणामुळे नुकसान होते हे देखील माहिती असते, पण ते ही सोडत नाहीत. हे तत्व देश आणि लोकांसाठीही लागू होते.