छेड काढणाऱ्या पुरुषाला महिलेने बदडले, व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 11:09 IST2022-02-17T11:08:56+5:302022-02-17T11:09:12+5:30

व्हिडीओमध्ये एक पुरुष ऑटो रिक्षात बसून आहे आणि ऑटोचालक व पीडित महिला त्याला ओढून बाहेर काढत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर महिलेने त्या पुरुषाला जबर मारहाण केली.

man beaten up by woman for eve-teasing on road, video viral | छेड काढणाऱ्या पुरुषाला महिलेने बदडले, व्हिडीओ व्हायरल

छेड काढणाऱ्या पुरुषाला महिलेने बदडले, व्हिडीओ व्हायरल

विराज देशपांडे

नागपूर : छेड काढणाऱ्या पुरुषाला एक महिला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना सीताबर्डी येथे घडल्याचे बोलले जात आहे; पण घटनेची तारीख स्पष्ट झाली नाही. सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी यासंदर्भात तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती दिली.

व्हिडीओमध्ये एक पुरुष ऑटो रिक्षात बसून आहे आणि ऑटोचालक व पीडित महिला त्याला ओढून बाहेर काढत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर महिलेने त्या पुरुषाला जबर मारहाण केली. या घटनेमुळे महिलेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. काही महिलांनी ‘लोकमत’सोबत बोलताना अशा घटना नेहमीच्याच झाल्याची तक्रार केली. एका महिलेने स्वत:चा अनुभव सांगताना, सीताबर्डीत एक पुरुष विनयभंग करून पळून गेल्याची माहिती दिली. तो प्रकार सर्वांनी पाहिला; पण कुणीच काही बोलले नाही. त्यानंतर संबंधित पुरुष दुसऱ्या महिलेची छेड काढताना पकडला गेला. पोलीस व नागरिकांनी अशा असामाजिक तत्त्वांपासून महिलांचे संरक्षण केले पाहिजे, असे संबंधित महिला म्हणाली.

अनेकजणी तक्रार करीत नाही

विनयभंग व छेडखानी झाल्यानंतर अनेक महिला व मुली बदनामीच्या भीतीमुळे आरोपीची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत नाही; परंतु नागरिकांनी अशा आरोपींना धडा शिकविला पाहिजे, तसेच पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे.

आचल मुखर्जी, मानसशास्त्र विद्यार्थिनी

Web Title: man beaten up by woman for eve-teasing on road, video viral