वारांगणा पुरविणारी ममता गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:03 AM2019-01-19T01:03:00+5:302019-01-19T01:04:28+5:30

ठिकठिकाणच्या वारांगनांना वेगवेगळ्या शहरात पाठविणाऱ्या ममता राजू सोनवाल (रा. जयपूर) हिला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. राजस्थानमध्ये जाऊन सामाजिक सुरक्षा पथकाने तिला अटक केली.

Mamta arrested, which provides the sex workers | वारांगणा पुरविणारी ममता गजाआड

वारांगणा पुरविणारी ममता गजाआड

Next
ठळक मुद्देराजस्थानात जाऊन केली अटक : नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठिकठिकाणच्या वारांगनांना वेगवेगळ्या शहरात पाठविणाऱ्या ममता राजू सोनवाल (रा. जयपूर) हिला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. राजस्थानमध्ये जाऊन सामाजिक सुरक्षा पथकाने तिला अटक केली.
वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे सामाजिक सुरक्षा पथकाने ७ जानेवारीच्या रात्री छापा घातला होता. तेथे हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालत असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी त्यावेळी कोलकाता जवळच्या एका तरुणीला देहविक्रय करताना रंगेहात पकडून पोलिसांनी तिला वेश्याव्यसाय करण्यास भाग पाडणाऱ्या माया ऊर्फ पूजा गोपाल राव हिला अटक केली होती. तिच्या चौकशीतून राजस्थानमधील मायाची ममता नामक एक महिला साथीदार वेगवेगळ्या प्रांतातील वारांगना वेगवेगळ्या राज्यात वेश्याव्यवसाय करण्यास पाठवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने ममताला अटक करण्यासाठी राजस्थानमधील जयपूर जवळच्या सांगनेर जिल्हा गाठला. जिल्ह्यातील प्रतापनगर सेक्टरमध्ये जाऊन पोलिसांनी गुरुवारी तेथे ममताला अटक केली. तिनेच कोलकाताची तरुणी आधी मुंबईला आणि तेथून मायाकडून कमिशन घेऊन मुंबईहून नागपूरला पाठविल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गौड, एएसआय अजय जाधव, हवलदार विजय गायकवाड, शिलाप्रसाद मिश्रा, शिपाई साधना चव्हाण यांनी ही कामगिरी बजावली. तिच्या चौकशीतून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: Mamta arrested, which provides the sex workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.