शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भाला मलेरियाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या संसर्गाची भीती ओसरत नाही तोच पूर्व विदर्भ मलेरियाच्या विळख्यात सापडला आहे. मागील वर्षी, जानेवारी ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या संसर्गाची भीती ओसरत नाही तोच पूर्व विदर्भ मलेरियाच्या विळख्यात सापडला आहे. मागील वर्षी, जानेवारी ते ऑक्टोबर यादरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या सहा जिल्ह्यात १८०९ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाली होती. यावर्षी तिपटीने वाढ होऊन रुग्णांची संख्या ५,८३० तर मृत्यूची संख्या १२ वर पोहचल्याने खळबळ उडाली आहे. विशेषत: गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यााठी मागील आठ महिन्यापासून आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे. परिणामी, इतर आजारांकडे काहीसे दुर्लक्ष झाल्यासारखे झाले आहे. परंतु लांबलेल्या पाऊस व जागोजागी पाणी साचून वाढलेल्या डासांमुळे हिवताप म्हणजेच मलेरियाचे रुग्ण वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या दरम्यान भंडारा जिल्ह्यात ६ रुग्ण, गोंदिया जिल्ह्यात २१७ रुग्ण व ३ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात ४२ रुग्ण, गडचिरोली जिल्ह्यात १५३० रुग्ण व १ मृत्यू, नागपूर जिल्ह्यात १० रुग्ण व १ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात ४ रुग्णांची नोंद झाली. यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये भंडारा जिल्ह्यात १३ रुग्ण व २ मृत्यू, गोंदिया जिल्ह्यात ३०६ रुग्ण व २ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात १८४ रुग्ण ३ मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यात ५,३१९ रुग्ण व ५ मृत्यू, नागपूर जिल्ह्यात ८ रुग्ण तर वर्धा जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

-जुलै महिन्यापासून रुग्णसंख्येत वाढ

जुलै महिन्यापासून सहाही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत असली तरी गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वाढ झाली. या महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात १६६९, गोंदिया जिल्ह्यात १६५ तर चंद्रपूर जिल्ह्यात ४२ रुग्ण आढळून आले. ऑगस्ट महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात ११५३, गोंदिया जिल्ह्यात ८० तर चंद्रपूर जिल्ह्यात ५० रुग्ण, सप्टेंबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात ४४०, गोंदिया जिल्ह्यात १५ तर चंद्रपूर जिल्ह्यात २५ रुग्ण तर ऑक्टोबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात ४२२ , गोंदिया जिल्ह्यात १३ तर चंद्रपूर जिल्ह्यात १० रुग्ण आढळून आले.

-मागील दोन महिन्यापासून रुग्णसंख्या कमी

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. परंतु मागील दोन महिन्यापासून जनजागृतीवर विशेष भर देण्यात आल्याने व आवश्यक उपाययोजना केल्याने रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे.

-डॉ. श्याम निमगडे

सहायक संचालक (हिवताप), आरोग्य विभाग

-धक्कादायक आकडेवारी

जानेवारी ते ऑक्टोबर २०१९

जिल्हारुग्ण मृत्यू

भंडारा ०६ ००

गोंदिया २१७ ०३

चंद्रपूर ४२ ००

गडचिरोली १५३० ०१

नागपूर १० ०१

वर्धा ०४ ००

जानेवारी ते ऑक्टोबर २०२०

जिल्हारुग्णमृत्यू

भंडारा १३ ०२

गोंदिया ३०६ ०२

चंद्रपूर १८४ ०३

गडचिरोली ५३१९ ०५

नागपूर ०८ ००

वर्धा ०० ००