सफेलकर टोळीवर मकोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:09 AM2021-04-09T04:09:49+5:302021-04-09T04:09:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गँगस्टर रणजित सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध शहर पोलिसांनी मकोका लावला आहे. विशेष म्हणजे, ...

Makoka on Safelkar gang | सफेलकर टोळीवर मकोका

सफेलकर टोळीवर मकोका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - गँगस्टर रणजित सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध शहर पोलिसांनी मकोका लावला आहे. विशेष म्हणजे, सफेलकरच्या टोळीतील एक डझनावर गुंड फरार असून, पोलीस त्यांचा जागोजागी शोध घेत आहेत.

कुख्यात सफेलकर याने नागपूर आणि आजूबाजूच्या भागातील अनेक जमिनी, दुकाने बळकावली असून, कोट्यवधींची माया जमविली आहे. अपहरण, हत्या, धमकी, खंडणी वसुली असेही गुन्हे सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंड नेहमीच करीत होते. प्रतिस्पर्धी गुन्हेगारांना संपवण्याचाही कट रचत होते आणि सुपारी घेऊन हत्याही करत होते. आर्किटेक्ट एकनाथ निमगडेची हत्या सफेलकरने पाच कोटी रुपयाची सुपारी घेऊन कुख्यात नब्बू आणि साथीदारांकडून करवून घेतली. तत्पूर्वी मनीष श्रीवास नामक गुंडाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याचे अपहरण केले आणि नंतर हत्या केली. ४ मार्च २०१२ ला घडलेल्या या हत्याकांडाबाबत कुणीच काही सांगायला, बोलायला तयार नसल्याने सफेलकर टोळी कमालीची निर्ढावली होती. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून

सफेलकरच्या पापाचा घडा फोडून त्याच्या आणि त्याच्या टोळीतील कालू तसेच भरत हाटे आणि हेमंत गोरखा या तिघांना अटक केली. ईसाक मस्ते, छोटू बागडे आणि अन्य साथीदार फरार आहेत. अटकेतील आरोपींच्या कबुलीजबाबावरून पोलीस आयुक्तांनी सफेलकर टोळीविरुद्ध मकोका लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार मकोकाचा गुन्हा लावण्यात आला असून, त्याचा तपास आता एसीपी बी.एन. नलावडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

----

आणखी एक गुन्हा दाखल

कोट्यवधीच्या जमिनीवर कब्जा - ५० लाखाची खंडणी मागितली

नागपूर - भिलगाव येथील डुमन श्रावण प्रगट (वय ५१) यांच्या ढाबा असलेली कोट्यवधीच्या जमिनीवर साथीदाराच्या माध्यमातून कब्जा मारून तो खाली करण्यासाठी ५० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने रणजित सफेलकर, शरद आणि कालू हाटे तसेच जितेंद्र कटारिया या चाैघांवर गुन्हा दाखल केला. निमगडे आणि मनीष श्रीवास हत्याकांड उघड झाल्यानंतर सफेलकर टोळीविरुद्ध या आठवड्यात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा होय. आणखी सुमारे डझनभर पीडित आपापले गाऱ्हाणे घेऊन गुन्हे शाखेत पोहचले आहेत. त्यामुळे सफेलकर टोळीविरुद्ध आणखी डझनभर गुन्हे दाखल होऊ शकतात. आम्ही या सर्व प्रकरणांची सखोल चाैकशी करीत असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी लोकमतला सांगितले.

----

Web Title: Makoka on Safelkar gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.