कचरा संकलन यंत्रणा अधिक सक्षम करा; आरोग्य समिती सभापती मनीषा अतकरे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 20:22 IST2026-04-08T20:22:17+5:302026-04-08T20:22:42+5:30

Nagpur : नागपूर शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी घराघरातून कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेला अधिक कार्यक्षम करण्याचे निर्देश वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती मनीषा अतकरे यांनी दिले आहेत.

Make the waste collection system more efficient; Health Committee Chairperson Manisha Atkare orders | कचरा संकलन यंत्रणा अधिक सक्षम करा; आरोग्य समिती सभापती मनीषा अतकरे यांचे आदेश

Make the waste collection system more efficient; Health Committee Chairperson Manisha Atkare orders

नागपूर : नागपूर शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी घराघरातून कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेला अधिक कार्यक्षम करण्याचे निर्देश वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती मनीषा अतकरे यांनी दिले आहेत.

​बुधवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात वैद्यकीय व आरोग्य समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपसभापती श्रीकांत आगलावे, समिती सदस्य पुजा भुगांवकर, रजनी वानखेडे, प्रमोद ठाकुर, भावना लोणारे, उपायुक्त राजेश भगत आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते.

​स्वच्छता मोहिमेला गती देण्याचे निर्देश

​शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिक कचरा टाकणार नाहीत, यासाठी ठोस उपाययोजना करण्यासोबतच नाला सफाईच्या कामात गती वाढवण्याचे निर्देश मनीषा अतकरे यांनी दिले. 

बैठकीत खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:

  • ​यंत्रणा सक्षमीकरण: घराघरातून कचरा संकलन करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करणे.
  • मनुष्यबळ: सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून स्वच्छतेचा दर्जा सुधारणे.
  • जनजागृती: मनपातर्फे करण्यात आलेल्या सौंदर्याकरणाची माहिती नगरसेवकांसह नागरिकांना देणे.


​अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

​सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना उपसभापती श्रीकांत आगलावे यांनी दिल्या. कामावर अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच, जुनी आणि नादुरुस्त कचरा संकलन वाहने तातडीने बदलून नवीन यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश सदस्य प्रमोद ठाकूर यांनी दिले.

​'स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६' चा रोडमॅप

​मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी विभागाच्या कामकाजाची माहिती समितीला सादर केली. पीआययू चमूतर्फे बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत 'स्ट्रॅटेजिक रोडमॅप फॉर सिटी एक्सलन्स' सादर करण्यात आला. यामध्ये कचरा विलगीकरण, रस्ते सफाई, डम्पिंग यार्डवरील कचऱ्याचे शास्त्रोक्त निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन आणि शहराचे ओडीएफ (ODF) व जीएफसी (GFC) मानांकन मिळवण्याबाबतच्या नियोजनाची माहिती देण्यात आली.

Web Title : कचरा संग्रहण प्रणाली को सुदृढ़ करें: स्वास्थ्य समिति अध्यक्ष मनीषा अतकरे का आदेश

Web Summary : मनीषा अतकरे ने नागपुर को प्रभावी स्वच्छता के लिए कचरा संग्रहण बढ़ाने का निर्देश दिया। समिति ने त्वरित कचरा संग्रहण, स्वच्छता कर्मचारियों की वृद्धि और जन जागरूकता पर ध्यान केंद्रित किया। उपस्थिति के लिए आधुनिक तकनीक और अनुपस्थित कर्मचारियों के खिलाफ कार्रवाई पर जोर दिया गया। 'स्वच्छ सर्वेक्षण 2025-26' के लिए एक रोडमैप में कचरा पृथक्करण और अपशिष्ट जल प्रबंधन शामिल था।

Web Title : Strengthen Waste Collection System: Health Committee Chairman Manisha Atakare's Orders

Web Summary : Manisha Atakare directed Nagpur to enhance waste collection for effective cleanliness. The committee focused on quicker waste collection, increased sanitation staff, and public awareness. Modern technology for attendance and action against absent staff were emphasized. A roadmap for 'Clean Survey 2025-26' included waste segregation and wastewater management.

टॅग्स :nagpurनागपूर