शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

संविधानाचा गैरवापर थांबवण्यासाठी कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 3:51 PM

संविधानाचा गैरवापर थांबविण्यासाठी कायद्याची आवश्यकता असून सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात याचा समावेश करावा, असे आवाहन संविधान फाऊंडेशनचे संस्थापक माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले आहे.

ठळक मुद्देसंविधान फाऊंडेशनचे राजकीय पक्षांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानाचा गैरवापर थांबविण्यासाठी कायद्याची आवश्यकता असून सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात याचा समावेश करावा, असे आवाहन संविधान फाऊंडेशनचे संस्थापक माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले आहे.संविधानाचा गैरवापर थांबविण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे, तेव्हा सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात याचा समावेश करावा, असे आवाहन खोब्रागडे यांनी केले आहे.अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणासाठी सहाव्या पंचवार्षिक योजनेपासून अर्थसंकल्पात तरतूद करून त्याच वित्तीय वर्षात योजनांवर खर्चाबाबत धोरण असेल तर सरकारकडून त्याचे पालन होत नाही. प्राप्त निधी पूर्ण खर्च होत नाही. या समाजावर अन्याय होणार नाही. म्हणून सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात अनुसूचित जाती-जमातीसाठी स्वतंत्र कायद्याचा मुद्दा समाविष्ट करावा, असेही खोब्रागडे यांनी म्हटले आहे.संविधानाची शपथ घेऊन कार्य करणारे लोकप्रतिनिधी, कार्यकारी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, न्याायालये, संविधानाशी एकनिष्ठ होऊन आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत. तसेच नागरिकसुद्धा आपल्या कर्तव्यांचे पालन संविधानानुसार करीत नाही. म्हणून यासाठी विशेष कायदा करण्यात यावा व उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा व्हावी. शिस्तप्रिय नागरिक व देशहित साधण्यासाठी हे आवश्यक आहे.न्यायालयाच्या स्वायत्ततेसाठी अखिल भारतीय न्यायिक सेवा कायदा करून त्यात समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करा. पदोन्नतीमध्ये आरक्षण आणि अनुशेष भरतीबाबत कायदा करा, संविधान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करा, मागास विद्यार्थ्यांना वेळीच शिष्यवृत्ती मिळेल अशी व्यवस्था करा, आदी मागण्याही खोब्रागडे यांनी केल्या असून या सर्व मुद्यांचा सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश करावा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिन