शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

विकास कामांना गती देऊन शहराला स्मार्ट करा :  आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:31 IST

विकास कामांना गती देऊन नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी बुधवारी एनएसएससीडीसीएलच्या आढावा बैठकीत दिले.

ठळक मुद्देएनएसएससीडीसीएलच्या कामांचा आढावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महापालिका अर्थसंकल्पात‘फ्युचर सिटी’ची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार शहरातील नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेश लिमिटेड(एनएसएससीडीसीएल)च्या माध्यमातून विकास कामांना गती देऊन नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी बुधवारी एनएसएससीडीसीएलच्या आढावा बैठकीत दिले. स्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.शहरातील बाजार भागांचा विकास करण्याची गरज आहे. शहरातील पाच बाजार भाग विकसित करण्याबाबतचा अहवाल तयार करा. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मनपाच्या शहर बसस्थानकावर स्मार्ट किऑक्स लावण्यात आले आहेत. या किआॅक्सवर ५० प्रकारच्या नागरी सुविधा तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पारडी, भरतवाडा, पुनापूर येथे कामे सुरू आहेत. ही सर्व कामे वेळेवर पूर्ण होणे आवश्यक असून सर्व कामांना गती द्या, तसेच भांडेवाडी येथील बायोमायनिंग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले.पार्किंग आरक्षणाचा अहवाल सादर कराशहरातील वाढती वाहनांची संख्या विचारात घेता मल्टीलेव्हल कार पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी शहराच्या विविध भागातील पार्किंग आरक्षणाचा अभ्यास करून विस्तृत अहवाल सादर करा, शहरात पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था तयार करण्यासाठी पब्लिक बाईक शेअरिंग सिस्टीम सुरू करण्यात यावी. ही संपूर्ण प्रणाली मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेSmart Cityस्मार्ट सिटीnagpurनागपूर