शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

मुख्य सोहळा शनिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:19 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदीक्षाभूमी : मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, राधामोहन सिंग, गहलोत, आठवले, बावनकुळे, बडोले प्रमुख अतिथी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :दरवर्षीप्रमाणे यंदाही प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदा ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन असून येत्या २७ सप्टेंबरपासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात होईल. शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्य सोहळा होईल. याबाबत सोमवारी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जा, उत्पादन शुल्क मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले आणि महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे राहतील.पत्रपरिषदेला स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, डॉ. सुधीर फुलझेले, अ‍ॅड. आनंद फुलझेले, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.सी. पवार उपस्थित होते.उद्या महिला परिषददीक्षाभूीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याची सुरुवात बुधवारी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महिला परिषदेद्वारे होणार आहे. २८ तारखेला सायंकाळी ६ वाजता ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे नाटक सादर करण्यात येईल. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी स्मारक समितीचे सदस्य एन.आर. सुटे यांच्या हस्ते पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण होईल. विलास गजघाटे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी समता सैनिक दलाच्यावतीने पंचशील झेंड्याला मानवंदना दिली जाईल. त्याच दिवशी सायंकाळी धम्मपरिषद होईल. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी राहतील.गुरुवारपासून धम्मदीक्षाधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यातर्फे बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. त्यात दरवर्षी हजारो लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. यंदाही २८ सप्टेंबरला सकाळी ९ वाजेपासून धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू होईल. ३० तारखेपर्यंत तो चालेल.मुख्य समारंभाचे दूरदर्शनवर थेट प्रसारण३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभाचे थेट प्रसारण दूरदर्शनसह लॉर्ड बुद्धा, आवाज इंडिया आणि यूसीएन या नागपुरातील वाहिन्यांवरून होणार आहे.