नागपूर तालुक्यात महिला राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:08 IST2021-02-13T04:08:59+5:302021-02-13T04:08:59+5:30
वाडी : सरपंच पदाच्या निवडणुकीनंतरही राजकीय पक्षामध्ये सत्तास्थापनेवरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. मात्र, नागपूर ग्रामीण तालुक्यात निवडणूक झालेल्या ११ ...

नागपूर तालुक्यात महिला राज
वाडी : सरपंच पदाच्या निवडणुकीनंतरही राजकीय पक्षामध्ये सत्तास्थापनेवरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. मात्र, नागपूर ग्रामीण तालुक्यात निवडणूक झालेल्या ११ पैकी ९ ग्रा.पं.च्या सरपंचपदी महिलांना संधी मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील ११ ग्रा.पं.मध्ये गुरुवारी सरपंच आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. तीत दुग्रधामना ग्रां.प.च्या सरपंचपदी साधना राजेंद्र कराळे, पुष्पा रवींद्र गायधने (बहादुरा), कविता चंद्रशेखर नामुर्ते (बोथली), वंदना मारुती थुटुरकर (धामनालिंगा), कल्पना सचिन कोराम (डोंगरगाव), रिता प्रवीण उमरेडकर (दवलामेटी), किरण सचिन नगरारे (पांजरी बुं), प्रतिभा मनोहर भोयर (पेठकाळडोंगरी) तर सोनेगाव (निपानी ) ग्रा.पं.च्या सरपंचपदी तेजस्विनी मोहनसिंग धुर्वे यांची निवड झाली. तालुक्यात कापसी (खुर्द) येथे सूरज पाटील आणि सुराबर्डी येथे ईश्वर गणवीर यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे.